सुनसान घरात एकटीच राहत होती तरुणी; पोलिसांनी वय विचारताच बसला मोठा धक्का, समोर आलं मोठं कांड

| Updated on: Mar 24, 2025 | 9:32 PM

उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये एक तरुणी राहत होती. ती तिथे आपल्या उपजीविकेसाठी छोटं, मोठं काम करत होती. एक दिवस अचानक तिथे पोलीस पोहोचले, त्यानंतर धक्कादायक घटना समोर आली आहे.

सुनसान घरात एकटीच राहत होती तरुणी; पोलिसांनी वय विचारताच बसला मोठा धक्का, समोर आलं मोठं कांड
प्रतिकात्मक छायाचित्र
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
Follow us on

उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये एक तरुणी राहत होती. ती तिथे आपल्या उपजीविकेसाठी छोटं, मोठं काम करत होती. एक दिवस अचानक तिथे पोलीस पोहोचले. पोलिसांनी त्या तरुणीला तीच वय विचारलं. त्यावर तिने जे उत्तर दिलं ते ऐकून पोलिसांनाही मोठा धक्का बसला. तीचं वय ऐकून पोलीस अधिकार्‍याला खात्री पटली की गेल्या वर्षभरापासून ते ज्या मुलीला शोधत होते, ती तीच मुलगी आहे. जेव्हा या मुलीने आपली आपबिती सांगितली तेव्हा सर्वजन सुन्न झाले.

काय आहे नेमकं प्रकरण?

हा सर्व प्रकार प्रेमप्रकरणातून घडला आहे. संबंधित तरुणी प्रेमात एवढी वेडी झाली की तिला तिच्या घरच्यांचा विसर पडला. तिने चित्रपटात जसं पाहिलं होतं, हिरो-हिरोईन पळून जाऊन लग्न करतात. त्यानंतर ते एकमेकांसोबत आयुष्यभर आनंदानं संसार करतात. स्वत:च घर बनवतात तसंच काहीसं स्वप्न या मुलीनं देखील पाहिलं. आपनही आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करू, त्याच्यासोबत आनंदानं राहू असं या मुलीला वाटलं. तिने कोणताही विचार न करता आपल्या कुटुंबाचा विचार न करता तीने तिच्या प्रियकरासोबत घर सोडलं. ते दोघे पळून गेले. मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाल्यानं तिचे कुटुंब हवालदिल झाले. त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी या मुलीचा शोध सुरू केला.त्यानंतर तब्बल एक वर्षानंतर या मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं आहे.

ही घटना 3 फेब्रुवारी 2024 रोजीची आहे. उत्तर दिल्लीच्या नरेला परिसरात राहणारी 16 वर्षांची मुलगी घरातून अचानक बेपत्ता झाली. त्यानंतर तिच्या कुटुंबाला असं कळलं की ती तिच्याच घराशेजारी राहणाऱ्या मुलासोबत पळून गेली आहे. या मुलाचं वय 19 वर्ष होतं. दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते, मात्र त्याची कल्पना या मुलीच्या घरच्यांना नव्हती. मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर हा सर्व प्रकार तिच्या घरच्यांना कळाला. त्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. आता एक वर्षानंतर या मुलीला शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. आग्रामध्ये ही मुलगी सापडली. पोलिसांनी या मुलीला तिच्या कुटुंबाकडे सोपावलं आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माबिती पोलिसांकडून देण्यात आली.

वीस हजारांचं बक्षीस

या मुलीची माहिती देणाऱ्या व्यक्तीला वीस हजारांच्या बक्षीसाची देखील घोषणा करण्यात आली होती. ही मुलगी घरातून पळून गेल्यानंतर आधी मुंबईला आली, त्यानंतर ती आग्रा येथे पोहोचली. तिच्यासोबत जो मुलगा होता त्याच्याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिलेली नाहीये.