उत्तर प्रदेश : विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास रोखले म्हणून संतापलेल्या सहाय्यक शिक्षिकेने मुख्याध्यापिकेलाच मारहाण (Beating to Principal) केल्याची घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात (Barabanki District in Uttar Pradesh) घडली आहे. या मारहाणीत मुख्याध्यापिका बेशुद्ध झाली आहे. यावेळी इतर शिक्षकांनी मध्यस्थी करत सदर शिक्षिकेला शांत कसेबसे केले. याप्रकरणी मुख्याध्यापकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात सदर शिक्षिकेविरोधात तक्रार (Complain file in local police station) दाखल केली आहे.
आरोपी शिक्षिका दररोज विनाकारण मुलांना मारहाण करत असे. आज पुन्हा तिने मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केल्याने मुख्याध्यापिकेने तिला रोखले. यानंतर तिने दादागिरी सुरु केली आणि मुख्याध्यापिकेचा गळा दाबून मारहाण करण्यास सुरुवात केली.
शाळेतील मारहाणीचा हा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करण्यात आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे प्रकरण बाराबंकीच्या देवा भागातील सिसवारा येथील शाळेतील आहे.
याप्रकरणी विद्यमान मुख्याध्यापिकेने सहाय्यक शिक्षिका नेहा रस्तोगी हिच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. सहायक शिक्षिका नेहा रस्तोगी दररोज विनाकारण मुलांना मारहाण करत असल्याचा आरोप मुख्याध्यापिकेने केला आहे.
शाळेतील इतर शिक्षकांनी महिला शिक्षिकेबाबत अनेक वेळा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. शनिवारी पुन्हा सहाय्यक शिक्षिकेने मुलांना मारहाण केली. यावेळी मुख्याध्यापिकेने रोखल्याने ती रागाने लालबुंद झाली आणि मुख्याध्यापिकेला गळा दाबून मारहाण करण्यास सुरुवात केली.
या घटनेमुळे शाळेतील मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास संबंधित अधिकाऱ्याकडे सोपवला आहे.