पनवेल : पनवेलमधून (Panvel) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वेश्या व्यवसायासाठी (prostitution) आणलेल्या सहा मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. या मुली राजस्थान (Rajasthan) आणि उत्तर प्रदेशमधून शहरात आणण्यात आल्या होत्या. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात देह विक्रीचा व्यवसाय सुरू होता. या प्रकरणातील आरोपी हे संबंधित मुलीचा फोटो ग्राहकांना दाखवून त्यांचा सौदा करायचे. या प्रकरणाची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपींना खांदा कॉलनी परिसरातून अटक करण्यात आली आहे. आरोपींची चौकशी सुरू असून, या प्रकरणात अन्य किती जणांचा सहभाग आहे याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वेश्या व्यावसाय सुरू होता. देह विक्रीसाठी राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधून मुली शहरात आणल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने सापळा रचण्यात आला. याप्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, सहा मुलींची सुटका करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे याचाही शोध घेतला जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरात देह विक्रीचा व्यवसाय सुरू होता. आरोपी देह विक्रिसाठी राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधून महिला आणि मुली आणत होते. त्यानंतर आरोपी संबंधित ग्राहकाला मुलीचा फोटो दाखवत होते. फोटो दाखवल्यानंतर डील करायचे. मात्र याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी मोठ्या शिताफीने दोन आरोपींना अटक करत सहा मुलींची सुटका केली आहे.
दरोड्याच्या उद्देशाने घरावर आठ ते दहा जणांचा हल्ला; फायरिंगही केली, घटना सीसीटीव्हीत कैद