पबजी (Pubg murder) खेळण्यापासून रोखणाऱ्या आईची हत्या एका 16 वर्षांच्या मुलाने केली. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) ही घटना घडली. आई रात्री झोपेत असताना बापाच्या लायसन्स बंदुकीतून त्यानं आईच्या चिंधड्या उडवल्या. रक्ताच्या थारोळ्यात तसाच आईचा मृतदेह पडून होता. तीन दिवस तो आईच्या मृतदेहासोबतच राहिला. धाकट्या बहिणीसमोरच हे हत्याकांड घडलं. तिलाही आईच्या मृतदेहासोबत ठेवलं. ही खळबळजनक घटना बुधवारी उघडकीस आली होती. आईचा मृतदेह (Lucknow Pubg Murder) कुजू लागल्यावर मुलगा घरात फ्रेशनर मारुन रादत होता. आईची हत्या केल्यानंतर 16 वर्षांच्या माथेफिरु मुलानं वडिलांना व्हिडीओ कॉलही केला होता. दरम्यान, आता या हत्याकांड प्रकरणा अल्पवयीन मुलाला पोलिसांना ताब्यात घेतलंय. पोलिसांनी या मुलाची चौकशीही सुरु केली. पोलिसांच्या चौकशीत या मुलानं दिलेली उत्तर अधिकच हादरवणारी होती. हा मुलगा नव्हे तर हैवान आहे, अशी शंका यावी, इतकी भीषण उत्तर या मुलानं पोलिसांच्या चौकशीत दिलीत. जाणून घ्या पोलिसांच्या प्रश्नाला मुलानं नेमकी उत्तर देताना काय म्हटलं?
प्रश्न : का केली आईची हत्या?
मुलानं काहीच उत्तर दिलं नाही.
प्रश्न : पुन्हा पोलिसांचा तोच प्रश्न…
मुलगा : मम्मी सारखं टोकायची. गेम खेळू देत नव्हती.
प्रश्न : गोळी कधी झाडलीस?
मुलगा : रात्री.. मम्मी झोपली होती तेव्हा.. पप्पांच्या पिस्तुलानं मारली गोळी
प्रश्न : भीती नाही वाटली, पोलीस पकडतील याची?
मुलाग : छे..नाही..
प्रश्न : बहिणीला काय सांगितलं?
उत्तर : मम्मीबद्दल कुणाला सांगितलं, तर तुलाही मारुन टाके. मुकाट्यानं राहा
प्रश्न : कोणता गेम खेळायचा तू फोन मध्ये?
उत्तर : ऑनलाईन गेम खेळायचो, पबजी, फाईटर इंस्ट्राग्रामवर.. मजा यायची, पण मम्मी रोखायची तर खूप राग यायचा
प्रश्न : पप्पानी मारलं असतं, तर त्यांनाही गोळी घातली असतीस?
मुलगा : माहीत नाय, तेव्हाचं तेव्हा पाहिलं असतं, आता काय सांगू..
प्रश्न : जेलमध्ये जावं लागेल, याचा काही विचार नाय केला?
मुलगा : नाही, एवढा विचार नाय करत..
प्रश्न : मित्रांसोबत पाटी का केलेली?
मुलगा : रात्री घाबरलो होतो आणि खूप दिवसांपासून त्यांच्यासोबत मूव्ही पाहिली नव्हती. ते मला म्हणत होते, त्यामुळे त्यांना म्हटलं की चला घरीच..
प्रश्न : बहिणीला खायला कुठून आणायचा?
मुलगा : स्कूटीवरुन बाहेर जायचो आणि खायला घेऊन यायचो. मनात जे यायचं ते खायला घेऊन यायचो
प्रश्न : घरातही जेवण बनवलं?
मुलगा : हो.. बहिणीला जे आवडायचं, ते बनवायचो..
प्रश्न : आता आई नाहीये तर वाईट नाही वाटत?
मुलगा : नाय.. नाय वाटत दुःख
प्रश्न : घरी फोन यायचा, तर तेव्हा काय सांगायचास?
मुलगा : मम्मीचा फोन माझ्याकडे, मम्मी आजीकडे गेलीय, आली की तिला सांगतो करायला, असं म्हणायचो..
प्रश्न : पप्पांचा फोन का नाही उचलला?
मुलगा : उचलला होता. पण नंतर जेव्हा खूपदा कॉल येऊ लागला, तेव्हा त्यांना सांगितलं असं असं झालंय..
प्रश्न : मोबाईलमध्ये पॉर्न बघायचास? आईला माहीत होतं?
मुलगा : माझे मित्र बघायचे, त्यांना कुणी नाही सांगायचं..
प्रश्न : गोष्ट कशाला रचलीस हत्येची?
मुलगा : वाटलं कुणाला काहीच कळणार नाही..
दरम्यान, आईची हत्या करणाऱ्या पित्यानं पोलिसांकडे अजबच मागणी केलीये. बापानं केलेली ही मागणी तर त्याहूनही भयानक असल्याची शंका कुणालाही यावी. बापानं पोलिसांकडे मुलाला माफ करण्याची मागणी केली आहे. बायको तर गेली. आता एकुलता एक मुलगा राहिलाय. अख्खा परिवार उद्ध्वस्त झालाय.
रागाच्या भरात त्याच्याकडून चूक झालीये. त्यामुळे त्याला माफ करुन परिवार वाचवावा, अशी मागणी बापाने पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, पोलिसांनी कायदेशीर कारवाईला सुरुवात केलीय.