Pune Crime : कुटुंबासह गावी निघाली होती, तेवढ्यात अपघात होऊन कार डॅममध्ये कोसळली अन.. क्षणात होत्याचं नव्हतं झालं !

| Updated on: Sep 01, 2023 | 2:57 PM

पीडित मुलगी व तिचे कुटुंबिय हे नांदेडचे रहिवासी आहेत. ते पानशेत या त्यांच्या गावी जात असताना अचानक टायर फुटल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला, अशी माहिती समोर आली आहे.

Pune Crime : कुटुंबासह गावी निघाली होती, तेवढ्यात अपघात होऊन कार डॅममध्ये कोसळली अन.. क्षणात होत्याचं नव्हतं झालं !
Follow us on

पुणे | 1 सप्टेंबर 2023 : पुणे-पानशेत रोडवर झालेल्या एका दुर्दैवी अन् भीषण अपघातात (accident) 16 वर्षाच्या मुलीला जीव गमवावा लागला आहे. टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती कार खडकवासला डॅममध्ये कोसळली. त्यानंतर तरूणीचा बुडू मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली. संस्कृती पवार असे मृत मुलीचे नाव असून ती कुटुंबियांसह गावाला जात असताना हा दुर्दैवी प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पवार कुटुंब हे नांदेडचे रहिवासी असून ते पानशेत इथल्या गावी जात होते. संस्कृतीचे वडील कार चालवत होते. प्रवास करत असताना बुधवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास गाडीचे टायर अचननक फुटले आणि त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती खडकवासला डॅममध्ये कोसळली. अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी त्यांना मदत करत बचाव कार्य सुरू केले. पण कार पाण्यात पूर्णपणे बुडाली आणि त्यातच संस्कृती हिचा मृत्यू झाला.

कारमधील प्रवाशांना वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पाण्यात उडी मारली. मात्र सर्वतोपरी प्रयत्न करूनही संस्कृती रात्रीपर्यंत अडकून राहिली. अखेर बऱ्याच वेळाने तिला वाहनातून बाहेर काढण्यात आले. आणि तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी उपचारांची शर्थ केली. तरीही तिला वाचवण्यात यश आले नाही आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.