विनय जगताप, भोर : पुण्याच्या भोरमधील (pune bhor) नेकलेस पॉईंटजवळ पिकअप टेम्पो (pickup tempo) पलटी झाल्यानं अपघात झाला आहे. पिकअप मधील 7 मजूर जखमी झाले आहेत. मजूर आणि बांधकाम साहित्य घेऊन जाणार पिकअप टेम्पो पुण्याहून भोरच्या दिशेने येत असताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती तिथल्या स्थानिकांनी दिली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमी झालेले सर्व मजूर परप्रांतीय आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्य करून अपघात ग्रस्तांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघातानंतर काहीकाळ या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती, राजगड पोलीसांकडून (bhor police) अधिक तपास सुरू आहे.
पुण्याच्या भोरमधीलपॉईंटजवळ पिकअप टेम्पो पलटी झाला. त्यावेळी पिकअपमध्ये 7 मजूर होते. ते सगळे मजूर जखमी झाले आहेत. पिकअप टेम्पो मजूर आणि बांधकाम साहित्य घेऊन पुण्याहून भोरच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. जखमी झालेले सर्व मजूर परप्रांतीय आहेत, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मदतकार्य करून अपघात ग्रस्तांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे. पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत. अपघातानंतर काहीकाळ या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती.
पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. त्याचबरोबर अपघात कशामुळे झाला याची चौकशी सुध्दा करणार आहे. जखमी झालेल्या सात मजूरांची सुद्धा पोलिस चौकशी करणार आहे. पिकअपमध्ये अधिक साहित्य असल्यामुळे अपघात झाला असावा अशी पोलिसांना शंका आहे.