विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येला एक आठवडाही पूर्ण नाही तर आणखी एक हत्येची घटना समोर आली आहे. पुण्यातील उत्तमनगर येथे मित्रानेच त्याच्या मित्रावर कोयत्याने वार करत त्याची हत्या केली आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली आहे. उत्तमनगर पोलिसांनी केला गुन्हा दाखल केला आहे.
जयदीप भोडेकर वय २२ अस मयत तरुणाचे नाव आहे. आरोपी अमित गुजरला उत्तमनगर पोलिसांनी केली अटक आहे. उत्तमनगर मासेअळीमध्ये ही घटना घडलीये. जयदीप भोडेकर आणि अमित गुजर दोघेही एकमेकांचे मित्र होते. दोघांमुळे किरकोळ वाद झाला आणि अमित गुजरने जयदीपला संपवून टाकलं. या प्रकरणाचा उत्तमनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
पुणे म्हणजे विद्यचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख आहे. मात्र आता ही ओळख पुसत चालली आहे. पुण्यामध्ये दिवसेंदिवस भरदिवसा हत्या होत आहेत. पुण्यामध्ये कोयता टोळीच्या गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच हल्ला झाला होता. रत्नदीप गायकवाड असं पोलीस अधिकाऱ्याचं नाव होतं. दीड दमडीचे गुंड पोलिसांवर हल्ला करण्याची हिंमत करू लागले आहेत.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला झाला. नाना पेठेमधील डोके तालीमसमोर घराजवळ उभे असलेल्या वनराज यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोरांनी आधी गोळीबार केला. त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने वारही केले. हा हल्ला घरगुती संपत्तीच्या वादातून झाल्याचं समोर आलं होतं. वनराज आंदेकर यांच्या बहिणीसह तिच्या पतीचा या हल्ल्यामागे हात होता.