पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’! कोथरूडमध्ये कोयता गँगने पाठलाग करत तरूणाला संपवलं

| Updated on: May 17, 2024 | 5:32 PM

Pune Crime News : पुण्यातील कोथरूड परिसरात पुन्हा दहशतीचं वातावरण पसरलं आहे. पाच ते सहा जणांनी एका तरूणाचा पाठलाग करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यात मुळशी पॅटर्न! कोथरूडमध्ये कोयता गँगने पाठलाग करत तरूणाला संपवलं
Follow us on

पुण्यातील कोथरूड परिसर पुन्हा एकदा हादरून गेला आहे. कुख्यात गुडं शरद मोहोळ याच्या हत्येनंतर कोथरूडमध्ये पूर्ववैमनस्यातून पाच ते सहा जणांनी जुन्या वादातून 22 वर्षीय तरुणाचा खून केल्याचं समोर आलं आहे. एकमेकाकडे बघितल्यामुळे महिनाभरपूर्वी आरोपी आणि हत्या झालेल्या तरूणामध्ये वाद झाल्याची पोलीस तपासात समजत आहे.  कोथरूडमधील डहाणूकर कॉलनीमध्ये ही घटना घडली असून श्रीनिवास शंकर वत्सलावर असं मयत तरूणाचं नाव आहे.

नेमकं काय घडलं?

कोथरूडमधील डहाणूकर कॉलनी येथे रात्री बाराच्या सुमारास मृत श्रीनिवास याला अडवण्यात आलं. त्यावेळी एक मित्रही त्याच्यासोबत होता. दोघांनाही पाच ते सहा जणांनी अडवलं, श्रीनिवास याला जबर मारहाण केली. मारहाण करून झाल्यावर आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. शरीरावर  गंभीर घाव झाले होते. श्रीनिवास  रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, त्याच्यासोबतचा मित्र भीतीने पळून गेलेला. जेव्हा त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं.

पुणे पोलिसांनी घटना घडल्यानंतर 24 तासाच्या आतच अलंकार पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व आरोपींना आता अटक केलेली आहे. एक महिन्यापूर्वी कर्वेनगर येथे मयत आणि आरोपींमध्ये एकमेकांकडे बघण्यावरून वाद झालेला होता आणि त्याचाच बदला घेण्यासाठी काल आरोपींनी मयताचा पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने वार करून खून केला.

दरम्यान, पोलीस व्यवस्थेचा धाक गुन्हेगारांना राहिला नाही हे यावरून स्पष्टपणे दिसून येतं. कारण कोयते घेऊन पाठलाग करून आरोपींनी श्रीनिवास याला संपवलं. पोलिसांनी सर्व गुन्हेगारांची ओळख परेड केली होती. मात्र तरीसुद्धा शुल्लक कारणावरून खून होत असेल तर गुन्हेगारांच्या मनात पोलिसांच्या खाकीची धास्ती दिसत नाहीये.