सर्वात मोठी बातमी : पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार

| Updated on: Sep 01, 2024 | 11:38 PM

Pune Crime News : पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. वीजपुरवठा खंडीत करत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर कोयत्याने हल्ला करत गोळ्या घालण्यात आल्या. वनराज आंदेकर यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलं आहे. वनराज आंदेकर यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

सर्वात मोठी बातमी : पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार
Follow us on

पुण्यामध्ये माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर कोयत्याने वार करत गोळीबार करण्यात आला. नाना पेठमधील डोके तालीमच्या समोर साडेआठच्या सुमारास वनराज आंदेकर यांच्यावर घरगुती वादातून गोळीबार झाल्याची माहिती समजत आहे. आंदेकर यांच्यावर पाच गोळ्या झाडल्यावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. वनराज आंदेकर यांना केईएम या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. वनराज आंदेकर हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत.

पुण्यातील कायम गजबलेला परिसर म्हणून ओळखला जाणाऱ्या नाना पेठेमधील डोके तालमीच्या समोर ही घटना घडली. वनराज आंदेकरांवर हल्ला करण्याआध त्या परिसरातील लाईट घालवण्यात आल्याची माहिती समजत आहे. त्यानंतर दुचाकीवर आलेल्या तीन ते चार जणांनी ते एकटे असल्याचे पाहून हल्ला केला. वनराज यांच्यावर आधी कोयत्याने वार केले आणि त्यानंतर गोळीबार केला. वनराज आंदेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना तिथून हल्लेखोरांनी पळ काढला.

पुणे महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीमध्ये वनराज आंदेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आसले होते. वनराज आंदेकर यांच्या आई राजश्री आंदेकर या 2007 आणि 2012 च्या महापालिका निवडणुकीमध्ये नगरसेविका होत्या. त्यासोबतच वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेसुद्धा नगरसेवक राहिले होते. तर वनराज आंदेकर पुण्याचे महापौरही राहिले होते.

दरम्यान, पुण्यातील नाना पेठेमध्ये आंदेकर टोळीचा दबदबा राहिला आहे. आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याला प्रमोद माळवदकर या गुंडाच्या हत्येमध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. बंडू आंदेकर याच्याविरूद्ध 1985 पासून हत्या,हत्येचा प्रयत्न, खंडणी, शस्त्र बाळगणेा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.