Pune : पुण्यात तरुणांचा धुडगूस सुरूच, येरवडा भागात दोन गटात दगडफेक, दारूच्या बाटल्या फोडल्या…

| Updated on: Jan 30, 2023 | 2:55 PM

यावेळी आनशा नावाच्या मुलाने "या कुत्राला आज सोडायचे नाही," असे म्हणून त्याने त्याच्या हातातील कोयत्याने जीवे मारण्याचा उद्देशाने खान याच्या डोक्यात दोन वेळा वार केले.

Pune : पुण्यात तरुणांचा धुडगूस सुरूच, येरवडा भागात दोन गटात दगडफेक, दारूच्या बाटल्या फोडल्या...
pune crime news
Image Credit source: tv9marathi
Follow us on

पुणे : पुर्ववैमन्यसातून पुण्यातील (Pune) येरवडा (yerwada) भागात दोन गटात तुफान दगडफेक झाली. तरुणांनी दारूच्या बाटल्या घरावर फोडून रस्त्यावर फोडून राडा घातला. विशेष म्हणजे तरुण एवढ्यावर थांबले नाहीत, तर हातात तलवारी,कोयते नाचवत परिसरात दहशत निर्माण केली. त्याचबरोबर एकाच्या डोक्यात कोयता हल्ला केला. त्यावेळी झालेल्या दुर्घटनेत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरण चार मुलांवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस (Yerwada Police) तरुणांचा शोध घेत आहेत.

अब्दुल्ला आमीरउल्ला खान (वय.१९,रा.लक्ष्मीनगर, येरवडा) असे कोयत्याचा हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न करणे,बेकायदा हत्यारे बाळगणे,दहशत माजविणे अशा कलमा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “फिर्यादी यांचा मोबाईल गहाळ झाल्याने मित्र महेश मिश्रा आणि आयुष यांना सोबत घेऊन शनिवारी रात्री येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. तक्रार देऊन तिघे दुचाकीवरून घरी येत असताना गजराज हेल्थ क्लब समोरून जात असताना ओळखीचे अंश पुंडे उर्फ आनशा, सुरेश कुडे उर्फ ममडया,नाग्या आणि यश पात्रे उर्फ काळ्या यांनी त्यांचा दुचाकीवरून पाठलाग केला.

हे सुद्धा वाचा

यावेळी आनशा नावाच्या मुलाने “या कुत्र्याला आज सोडायचे नाही,” असे म्हणून त्याने त्याच्या हातातील कोयत्याने जीवे मारण्याचा उद्देशाने खान याच्या डोक्यात दोन वेळा वार केले. जखमी अवस्थेत त्यांनी थेट येरवडा पोलीस ठाणे गाठले. खान याला मारहाण केल्याचे समजताच दोन टोळक्यांनी एकमेकांवर आणि परिसरातील घरांवर, रस्त्यावर तुफान दगडफेक करून दारूच्या बाटल्या फोडल्या. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.