गेल्या काही दिवसापासून पुणे शहर कायम चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत असतानाच माजी नगरसेवकाच्या हत्येने पुणे हादरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भर चौकात हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. पुण्यातील नाना पेठ येथील डोके तालमीच्या समोर वनराज आंदेकरांवकर गोळ्या झाडण्यात आल्या. इतकंच नाहीतर आरोपींनी गोळ्या घालून झाल्यावर कोयत्यानेही त्यांच्या सपासप वार केले. या प्रकरणातील वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींची नावे समोर आली आहेत. वनराज आंदेकर यांच्या हल्ला करणाऱ्या आरोपींमध्ये गणेश कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड आणि तुषार आबा कदम यांची नावे समोर आली आहेत. गणेश कोमकर हा कुख्यात गुंड बंडू उर्फ सुर्यकांत आंदेकर याचा जावई असल्याची माहिती समजत आहे.
वनराज आंदेकर कार्यजवळ एकटेच उभे होते, त्यावेळी डोके तालीम चौकातील लाईट घालवण्यात आली. अंधाराचा आणि आंदेकर एकटे असल्याचा फायदा घेत आरोपी दुचाकीवर आले आणि पाच राऊंड फायर केले. गोळीबार झाल्यावर परिसरात मोठी खळबळ उडाली, आरोपींनी वनराज आंबेकर यांच्यावर गोळीबार केल्यावर कोयत्यानेही वार केले. काही क्षणात आंदेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले त्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. वनराज आंदेकर यांनी केईम रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
कौटुंबिक कार्यक्रम असल्यामुळे वनराज आंदेकर एकटेच होते. वनराज आंदेकर यांची हत्या करणारा संशियत आरोपी गणेश कोमकर हा कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांचा जावई आहे. त्यामुळे आंदेकरांची हत्या घरगुती कारणामुळे झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. हत्येमागचे नेमके कारण आणि यामध्ये आणखी आरोपी आहेत का हे आता पोलीस तपासामध्ये समोर येईल. पुण्यातील नाना पेठेमध्ये आंदेकर टोळीचा दबदबा राहिला आहे. आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याला प्रमोद माळवदकर या गुंडाच्या हत्येमध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. बंडू आंदेकर याच्याविरूद्ध 1985 पासून हत्या,हत्येचा प्रयत्न, खंडणी, शस्त्र बाळगणेा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पुणे महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीमध्ये वनराज आंदेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आसले होते. वनराज आंदेकर यांच्या आई राजश्री आंदेकर या 2007 आणि 2012 च्या महापालिका निवडणुकीमध्ये नगरसेविका होत्या. त्यासोबतच वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेसुद्धा नगरसेवक राहिले होते. तर वनराज आंदेकर पुण्याचे महापौरही राहिले होते.