पुणे : हॉस्टेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत एक विद्यार्थ्याचा मृतदेह (Student Dead body) आढळून आल्यानं पुण्यातील एफटीआयआय हादरलं. 32 वर्षीय विद्यार्थ्याच्या गूढ मृत्यूने पुण्यातील एफटीआयआयमध्ये खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. या घटनेप्रकरणी पुण्यातील डेक्कन जीमखाना पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून आता या विद्यार्थ्याच्या मृत्यूचं कारण शोधलं जात आहे. प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे. हा विद्यार्थी मूळचा उत्तर गोव्यातील (North Goa) असून तो शिक्षणासाठी पुण्यातील एफटीआयआयमध्ये (FTII, Pune Crime News) आला होता. एफटीआयआयच्या सिनेमॅटोग्राफी या विभागात तो शिकत होता. डेक्कन जीमखाना पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी मुरलीधर करपे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता ही घटना घडकीस आल्यानं पुण्यातील एफटीआयआय परिसरात एकच खळबळ उडाली होती.
आपल्या हॉस्टेलमधील रुमध्ये 32 वर्षांच्या तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानंतर लगेचच तरुणाला खाली उतरवण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. पण तिथं त्याला मृत घोषित करण्यात आल्यानंतर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली.
एका नायलॉन रोपच्या मदतीने या 32 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावल्यानं पोलिसांच्या पाहणीत आढळून आलं होत. खिडकीला नायलॉन रोप लावून त्याने गळफास घेतला होता. दरम्यान, या तरुणाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या पोस्ट मॉर्टेम रिपोर्टची प्रतीक्षा पोलिसांना आहे. यानंतरच अनेक गोष्टींचा खुलासा होईल.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान, हॉस्टेलमधील विद्यार्थ्याच्या रुमची पाहणी केली असला, तिथे कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्याच्या मृत्यू गूढ वाढलंय. आता या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी शुक्रवारीच पोलिसांनी या घटनेची माहिती दिली असून पुढील तपास केला जातोय.
एफटीआयआयच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेतलेल्या तरुणाशी संबंधित मुलांशी आणि यंत्रणांशी पोलिसांनी विचारपूस केली आणि त्यांचे जबाबही नोंदवून घेतले आहे. या चौकशीतून पोलिसांनी मृत तरुण हा मानसिक तणावाखाली होता, अशी माहिती समोर आली आहे. मंगळवारी त्याला शेवटचं पाहिलं गेलं होतं. हा तरुण एकटात हॉस्टेलमधील रुपमध्ये राहात होता. गेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड अस्वस्थही होता, अशीही माहिती काही विद्यार्थ्यांनी दिली. 2017च्या बॅचचा हा विद्यार्थी असून तो सिनेमॅटोग्राफी विभागात शिकत होता, अशी माहिती एफटीआयआयचे रजिस्ट्रार सईद राबीहाश्मी यांनी आपल्या जबाबातून दिली आहे.