विनय जगताप, TV9 मराठी, पुणे : पुणे-सातारा महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात (Luxury Bus Accident) होऊन पाच जण जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. टायर फुटल्यानं (Tire burst) नियंत्रण सुटून बस दुभाजाक ओलांडून विरुद्ध दिशेला उभ्या असणाऱ्या मालवाहू ट्रकला धडकली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र 5 जण जखमी (Five Injured) झाले असून, एक जण गंभीर जखमी आहे. पुणे-सातारा महामार्गावरील सारोळे गावाजवळ ही घटना घडली.
सदर लक्झरी बस साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येत होती. सारोळे गावाजवळ येताच बसचा टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे बस दुभाजाक ओलांडून विरुद्ध दिशेला उभ्या असणाऱ्या मालवाहू ट्रकवर जाऊन धडकली. अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
रस्त्याच्या विरुद्ध दिशेला पेट्रोल भरण्यासाठी थांबलेल्या मालवाहतूक करणाऱ्या NTC लॉजिस्टिक्स कुरिअर कंपनीच्या ट्रकला बस समोरून धडकली. सोरोळे गाव हद्दीमध्ये इंडियन पेट्रोल पंप जवळच ही घटना घडली.
अपघातातील सर्व जखमींना पुढील उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. अधिक तपास किकवी पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत.
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून पिंपळगाव बसवंत शहरकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या उभ्या ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. क्षणातच ट्रकने पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला.
स्थानिकांनी घटनास्थळावरून तातडीने याबाबत अग्निशमन विभागास आग लागल्याची माहिती दिली. पिंपळगाव ग्रामपालिकेच्या अग्निशमन दलाने अवघ्या वीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आगीत ट्रकच्या कबिनचे आतील बाजूचे पूर्ण नुकसान झाले आहे.