भर दिवसा तलवार, कोयते निघाले; 8 जणांना अटक, पुण्यात गुंडांचा हैदोस

| Updated on: Jan 23, 2023 | 5:50 PM

आकाश भिसे यालाही आरोपींनी मारहाण केली होती. आकाश त्यावेळी त्याच्या वडिलांसोबत मार्केटयार्डात जात होता. त्यावेळी अनिलसिंग टाकने शिविगाळ केल्याचं दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

भर दिवसा तलवार, कोयते निघाले; 8 जणांना अटक, पुण्यात गुंडांचा हैदोस
CRIME NEWS
Follow us on

पुणे : येथील गु्न्हेगारीत गेल्या काही दिवसांपासून वाढ होतान दिसत आहे. शैक्षणिक शहर अशी ओळख आता गुन्हेगारीचं शहर असं होण्याच्या मार्गावर आहे. भर दिवसा गुन्हेगार तलवारी, कोयते काढतानाची घटना यात भर घालणारी आहे. दोन गुंडांच्या टोळ्यांमध्ये वाद झाला. मोटारसायकल हळू चालवं, असं सांगण्यात आलं. यावरून दोन गुंडांच्या टोळ्यांमध्ये मार्केटयार्डामधील आंबेडकरनगरात वाद झाला. दोन गट एकमेकांवर तुटून पडले. तलवार, कोयते काढण्यात आले. पोलिसांनी दोन्ही गटातील ८ जणांना अटक केली आहे.

याप्रकरणी अनिलसिंग टाक याने मार्केटयार्ड पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी दत्ता भिसे, विजय भिसे यांना अटक केली. रविवारी सकाळी ही घडना घडली.

भरधाव बाईक चालवत होता

अनिलसिंग टाक आणि आरोपी हे एकाच परिसरात राहतात. दत्ता भिसे यांचा पुतण्या आशाक भिसे हा अनिलसिंगच्या घरासमोरून जात होता. बाईक भरधाव होती. त्यामुळं बाईक हळू चालव, असं सांगितलं.

याचा आरोपींना राग आला. ते परत गेले, तलवार, कोयते घेऊन पुन्हा आले. कोयता व काठीने मारहाण करून दशहत निर्माण केली. जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

आकाश भिसेलाही मारहाण

याविरोधात दत्ता भिसे यानेसुद्धा मार्केटयार्ड पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी पिंटसिंग दुधानी, अनिलसिंग टाक, सिकंदरसिंग टाक, रोहित दुधानी यांनासुद्धा अटक केली.

आकाश भिसे यालाही आरोपींनी मारहाण केली होती. आकाश त्यावेळी त्याच्या वडिलांसोबत मार्केटयार्डात जात होता. त्यावेळी अनिलसिंग टाकने शिविगाळ केल्याचं दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींना अटक केली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डाबेराव आणि पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.