बारामती : बारामतीमधील (Baramati Crime News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईचाच (Son tried to kill Mother) जीव घेण्याचा प्रयत्न केला. भर रस्त्यात त्याने हे कृत्य केलं. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झालाय. आरोपी मुलाने आईकडे पेन्शनच्या (Pension) पैशांची मागणी केली होती. पण आईने पैसे देण्यास नकार दिल्यावर मुलाने धक्कादायक पाऊल उचललं.
एकीकडे बारामतीमध्ये गुरुवारी संध्याकाळी झालेल्या अपघाता आईसह मुलाचाही जीव गेल्यानं हळहळ व्यक्त केली जात होती. तर दुसरीकडे पेन्शनसाठी आईच्या जीवावर उठलेल्या मुलाविरोधात संताप व्यक्त केला जातोय.
व्हायरल व्हिडीओ मध्ये एक वृद्ध महिला रस्त्याच्या कडेला दगडांवर बसली असल्याचं दिसून आलंय. या महिलेसमोर एक पुरुष उभा होता. हा पुरुष या महिलेचा मुलगा असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
धक्कादायक बाब म्हणजे बराच वेळ या दोघांमध्ये बाचाबाची होते. मुलगा आपल्या आईकडे पेन्शनच्या मिळालेल्या पैशांची मागणी करत असतो. पण आई त्याला पैसे नकार देते. इतक्यात मुलाचा राग अनावर होतो आणि धक्कादायक पाऊल उचलतो.
भर रस्त्यामध्ये मुलगा आईचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो. रस्त्यावरच पडलेला एक लाकडाचा मोठा ठोकळा मुलगा आपल्या हातांनी उचलतो. उचललेला ठोकळा थेट आईच्या डोक्यात घालतो.
आई मुलाच्या हल्ला चुकवण्याचा प्रयत्न करते. डोकं खाली केल्यानं मुलाने डोक्यात घातलेला लाकडाच्या ढोकळ्याचा वार थोडक्यात चुकतो. पण तरिही लाकडाचा ठोकळा हा आईच्या डोक्याला खरचटून जातोच.
मुलाच्या हल्ल्यात वृद्ध महिलेला जखम होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं पोलिसांनी याची गंभीर नोंद घेतली आहे. याप्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास केला जातो आहे.