आरोपीचं नाव राम, पण काम धक्कादायक! विवाहितेसोबत नेमकं राम याने काय केलं?

| Updated on: Nov 23, 2022 | 9:00 AM

जुनी ओळख, जुने प्रेम संबंध, तरुणीचं दुर्लक्ष आणि प्रियकराची तडफड! चाकण येथे हत्येचा थरार

आरोपीचं नाव राम, पण काम धक्कादायक! विवाहितेसोबत नेमकं राम याने काय केलं?
चाकणमध्ये हत्याकांड
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पुणे : पुण्यातील चाकण (Chakan Murder) भागात एक धक्कादायक घटना घडली. राम सूर्यवंशी नावाच्या एका इसमाने विवाहित तरुणीचा गळा चिरुन हत्या केली. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटकही केली आहे. या आरोपीच्या चौकशीतून खळबळजनक माहिती उघडकीस आलीय. हत्या (Pune Crime News) करण्यात आलेल्या विवाहित तरुणीचं नाव निकीता कांबळे असून निकिती 28 वर्षांची होती. हे हत्याकांड चाकण औद्योगिक (Chakan MIDC) क्षेत्रातील खराबवाडी इथं घडलं.

राम आणि निकीता एकमेकांना खूप आधीपासून ओळखत होते. जुन्या प्रेमसंबंधकांकडे प्रेयसी दुर्लक्ष करते, याचा राम सूर्यवंशी याला राग आला होता. लग्न झाल्यानंतर निकीता कांबळे या विवाहित तरुणीने राम याच्याशी बोलणं टाळलं होतं. यामुळे राम अधिकच अस्वस्थ झाला होता. अखेर त्याने यातूनच टोकाचं पाऊल उचललं.

जुन्या प्रेम संबंधांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या रागातून प्रियकर राम याने निकीताची निर्घृण हत्या केली. निकीताचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. संतापाच्या भरात राम सूर्यवंशी याने विवाहित निकीताचा गळा चिरुन हत्या केली असल्याचं अखेर समोर आलं.

चाकण औद्योगिक क्षेत्रातील खराबवाडी इथं हे धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलंय. या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे. महाळुंगे पोलिसांनी राम सूर्यवंशी याला बेड्या ठोकून त्याच्यावर अटकेची कारवाई केली. आता याप्रकरणी महाळुंगे पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांच्या आत पुण्यात उघडकीस आलेलं हे दुसरं हत्याकांड आहे. याआधी एक पतीने दुसरा प्रेमविवाह करण्यासाठी आपल्या पहिल्या पत्नीची हत्या केली असल्याचाही प्रकार समोर आला होता. पौड पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत आरोपी स्वप्निल सावंत याला अटक केली. त्यानंतर आता चाकणमध्येही प्रेम प्रकरणातूनच हत्याकांड घडल्यानं खळबळ माजलीय.