Pune Crime : पदोन्नतीसाठी महिला कर्मचाऱ्याकडे नको ‘ती’ मागणी, पुण्यात चाललंय काय?

| Updated on: Jul 29, 2023 | 12:58 PM

पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. घरात आणि घराबाहेर महिलांवर अन्याय होत आहेत. अशाच एक धक्कादायक घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे.

Pune Crime : पदोन्नतीसाठी महिला कर्मचाऱ्याकडे नको ती मागणी, पुण्यात चाललंय काय?
अकोल्यात डॉक्टरकडून तरुणीचा विनयभंग
Image Credit source: Google
Follow us on

पुणे / 29 जुलै 2023 : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पदोन्नतीसाठी एका महिला कर्मचाऱ्याकडे बँक अधिकाऱ्याने शारीरिक सुखाची मागणी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरुन, लष्कर पोलिसांनी बँक अधिकाऱ्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 354 ए, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यावरुन आरोपींना कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे दिसून येते.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील एका नामांकित बँकेत ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आरोपी अधिकारी महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन करायचा. तसेच फिर्यादी महिलेसह इतर महिला कर्मचाऱ्यांना उशिरापर्यंत कामावर ठेवायचा. त्याचे म्हणणे न ऐकल्यास महिला कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याची धमकी देत शिवीगाळ करायचा. तसेच महिलांच्या शरीराला स्पर्श करुन त्यांचा विनयभंग करत असे. एवढ्यावरच तो थांबला नाही. पदोन्नती मिळवण्यासाठी शारीरिक सुखाची मागणी केली. अखेर अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून एका महिला कर्मचाऱ्याने पुढाकार घेत लष्कर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

हे सुद्धा वाचा