पुणे : महाराष्ट्रात विशेषत: राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहरात एक संतापजनक आणि किळसवाणी घटना समोर आली आहे. काही नराधमांनी मिळून अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची प्रचंड संतापजनक घटना समोर आली आहे. या अशा घटनांमुळे या पुरोगामी महाराष्ट्राची नेमकी वाटचाल आता कोणत्या दिशेला होतेय? असा प्रश्न उपस्थित होतोय. महाराष्ट्राची एक वेगळी आणि चांगली अशी ओळख आहे. पण महाराष्ट्राच्या पोटात विशेषत: पुण्यात अशा प्रकारची घटना उघड झाल्याने मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पुण्यात रेल्वे स्थानक परिसरातून एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन रेल्वेतील दोन कर्मचारी आणि काही रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 8 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
पीडित 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही 31 ऑगस्टच्या रात्री गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आली होती. यावेळी काही आरोपींना इतक्या रात्री तुला गाडी मिळणार नाही असे सांगून तिला रेल्वे स्थानकाबाहेर आणले. त्यानंतर तिचे अपहरण करत वानवडी परिसरात नेले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तब्बल दोन दिवस हा सर्व प्रकार सुरु होता.
दरम्यान रविवारी (5 सप्टेंबर) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. वानवडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपींची ओळख पटवून तब्बल आठ जणांना अटक केली. या संपूर्ण प्रकरणात आणखीनही काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
संबंधित घटना ही 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत घडल्याची माहिती पीडितेने दिली आहे. पीडितेने याबाबत पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. या कारवाई त्यांनी आठ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पुण्यासारख्या जिल्ह्यात या अशाप्रकारच्या घटना घडत असतील तर इतर भागांचं काय? विशेष म्हणजे आरोपींना पोलिसांचा जरा सुद्धा धाक राहिलेला नाही. आरोपी अवघ्या 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण करतात त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करतात तोपर्यंत पोलीस प्रशासन नेमकं कुठे गेलं होतं? असा प्रश्न उपस्थित होतोय. आरोपींच्या मनात पोलिसांप्रती असलेली भीती राहिलेली नाही. त्यातूनच या अशा घटना उघडकीस येताना दिसत आहेत, असं मत आता स्थानिकांकडून व्यक्त केलं जात आहे. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा आहे. याप्रकरणाता पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. पीडित अल्पवयीन मुलीला न्याय मिळेल, अशी आशा करुयात.
विशेष म्हणजे अवघ्या दहा दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड येथून अशीच काहिशी घटना समोर आली होती. दोन सराईत बाल गुन्हेगारांनी अल्पवयीन मुलीवर वांरवार सामूहिक बलात्कार केला होता. आरोपींनी पीडितेवर अत्याचार करताना मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यानंतर ते मुलीला तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी द्यायचे. अशाच प्रकारची धमकी देवून त्यांनी पीडित अल्पवयीन मुलीवर अनेकदा सामूहिक बलात्कार केला. आरोपींकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडितेने आपल्या कुटुंबियांनी याबाबत तक्रार करु, असं सांगितलं असता आरोपींनी पीडितेला तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिता प्रचंड घाबरली होती.
पोलिसांनी याप्रकरणी दोन बाल गुन्हेगार आणि एका सज्ञान आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींपैकी एका बाल गुन्हेगाराला ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे आरोपी दोन बाल गुन्हेगारांवर पूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पीडिता आणि तिचे कुटुंबिय आरोपींच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्यास घाबरत होते.
हेही वाचा :
घरकाम करणाऱ्या महिलेची दगडाने ठेचून हत्या, कल्याणच्या उच्चभ्रू भागात मृतदेह आढळला
बाप झाला वैरी, आधी 10 वर्षांच्या लेकीला संपवलं, नंतर आणखी टोकाचं पाऊल, अहमदनगरमध्ये खळबळ