Pune crime | शिरूरमध्ये आजी आजारी असल्याचे सांगत केले डॉक्टरचे अपहरण अन … वाचा संपूर्ण घटना

| Updated on: Feb 07, 2022 | 12:07 PM

डॉक्टर दुचाकीवरून जात असताना आरोपी कारमधून येत होते. काहीअंतर गेल्यानंतर आरोपींनी कार डॉक्टरांच्या दुचाकीला आडवी लावली.त्यानंतर त्यानां जबरदस्तीने कारमध्ये बसवले त्यानंतर त्यांच्या गळ्याला धारदार कोयता लावत जीव मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली.

Pune crime | शिरूरमध्ये आजी आजारी असल्याचे सांगत केले डॉक्टरचे अपहरण अन ... वाचा संपूर्ण घटना
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

पुणे – जिल्ह्यात गुन्हेगारीच्या(crime) घटना वाढत असताना गुन्हे करण्यासाठी नवनवीन प्रकार वापरले जातात. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे अशीच घटना घडती आहे. शिरूर येथे एका नामांकित डॉक्टरचे पेशंट तपासण्याच्या बहाण्याने अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकच नव्हे तर अपहरण केलेल्या डॉक्टरला (doctor) सोडण्यासाठी सुमारे तीन लाखाची खंडणी घेतल्याच्या माहिती समोर आली आहे. त्या प्रकरणी शिरणार पोलिसांनी तब्बल आठ जणांवर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. डॉ.संदीप तुळशीराम परदेशी (वय 59 वर्ष, व्यवसाय, वैदयकीय व्यवसायिक, रा. यशोदीप मारुती आळी शिरूर) यांनी शिरूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. तक्रारीची तातडीने दाखल घेत शिरूर पोलिसांनी(Shirur police) तातडीने तपास चक्रे फिरवत यातील पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेशन पोलिस पथकाच्या मदतीने आरोपी कुणाल सुभाषसिंग परदेशी रा . शिरूर यास अटक केली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्याबरोबरच आठ जणांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली.

तर झालं असं कि
आरोपीनी डॉक्टरला आजीला बरे नाही वाटतं नाही तुम्ही तातडीनं चला असे सांगितले त्यानंतर पेशंटला बघण्यासाठी म्हणून डॉक्टर तातडीने निघाले. डॉक्टर दुचाकीवरून जात असताना आरोपी कारमधून येत होते. काहीअंतर गेल्यानंतर आरोपींनी कार डॉक्टरांच्या दुचाकीला आडवी लावली.त्यानंतर त्यानां जबरदस्तीने कारमध्ये बसवले त्यानंतर त्यांच्या गळ्याला धारदार कोयता लावत जीव मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली. त्यानंतर त्यांच्या खिशातील रोख पंधरा हजार रुपये काढून घेतले. पुन्हा मारहाण करत कापडाने त्यांच्या गळा आवळला व त्यांच्याकडून तीन लाख रुपयांची खंडणी उकळली. या सगळ्यानंतर शिरूर बाह्यमार्गावर नगर पुणे रोडवर सोडुन दिले. य प्रकरणी शिरूर पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण उंदरे करीत आहेत .

LIC चा जगभरात डंका, परताव्याच्या बाबतीत आघाडीवर, देशातंर्गत बाजारातील मोठी हिस्सेदार

बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी एकाला अटक, विद्युत प्रवाह सोडल्यामुळे झाला मृत्यू; वनविभागाकडून चौकशी

Sudhir Kalingan: कोकणचो दशावतारी हरवलो; ‘लोकराजा’, ‘नटसम्राट’ सुधीर कलिंगण यांचं निधन