पुण्यात नात्याला काळिमा, जन्मदात्यासह आजोबा आणि काकाकडून सहा वर्षे अत्याचार

| Updated on: Nov 19, 2022 | 7:17 PM

पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376, 354 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा, 2012 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात नात्याला काळिमा, जन्मदात्यासह आजोबा आणि काकाकडून सहा वर्षे अत्याचार
पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पुणे : महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेत नाहीत. अशीच एक अत्याचाराची धक्कादाक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. जन्मदात्या पित्यासह आजोबा आणि काकांनी अल्पवयीन मुलीवर तब्बल सहा वर्षे बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पित्याला अटक केली आहे. तर काका आणि आजोबाचा पोलीस शोध घेत असून, लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

पीडित मुलगी 2016 ते 2018 दरम्यान उत्तर प्रदेशातील तिच्या गावी आजोबा आणि काकासोबत राहत होते. यादरम्यान आजोब आणि काकाने तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

यानंतर 2018 मध्ये मुलगी आपल्या आई-वडिलांकडे परत रहायला आली. पुण्यात आल्यानंतर मुलीने आपल्या वडिलांना आपल्यावरील अत्याचाराबात चिट्ठी लिहून सांगितले.

हे सुद्धा वाचा

वडिलांनी मुलीवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याऐवजी स्वतः मुलीवर बलात्कार करण्यास सुरवात केली. आई घरी नसताना नराधम बाप मुलीवर बलात्कार करायचा.

आरोपींविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

अत्याचाराला कंटाळून बुधवारी अखेर मुलीने पोलिसांसमोर सर्व घटना कथन केली. यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376, 354 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा, 2012 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बापाला अटक, अन्य दोघांचा शोध सुरु

पोलिसांनी नराधम पित्याला तात्काळ अटक केली आहे. अन्य आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले. सध्या मुलीची काऊन्सिलिंग सुरु आहे.