पुणे : उच्चशिक्षित कुटुंबातील पती-पत्नींमध्ये शिक्षणावरुन वाद झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे विद्येचं माहेरघर म्हणून ख्याती असलेल्या पुण्यातच हा प्रकार घडला आहे. पुढील शिक्षणासाठी पैसे मागितल्याच्या रागातून पतीने पत्नीला विहिरीत ढकलल्याचा आरोप केला जात आहे.
काय आहे प्रकरण?
पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात उच्चशिक्षित कुटुंबात हा प्रकार घडला. पुढील शिक्षणासाठी पैसे मागितल्याच्या कारणावरुन पती पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. याच रागातून पतीने पत्नीला विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप केला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे महिलेला विहिरीतून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.
इस्त्रीवरुन वाद झाल्याचं सांगण्याची धमकी
विशेष म्हणजे इस्त्रीच्या कारणावरुन वाद झाल्याचे सांगण्याची धमकी पतीने पत्नीला दिल्याचा दावा केला जात आहे. वनिता राठोड असे 24 वर्षीय पीडित महिलेचे नाव आहे, तर अनिल राठोड असे पतीचे नाव आहे. मंचर पोलिस स्टेशनमध्ये पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात पती-पत्नीची हत्या
दुसरीकडे, पती-पत्नीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे हा प्रकार घडला. भंगार विकलेल्या पैशाच्या वादातून हे दुहेरी हत्याकांड घडले असल्याचं उघड झालं आहे.
काय आहे प्रकरण?
पती किसन वाघ आणि पत्नी मोंढाबाई वाघ या दाम्पत्याची हत्या झाली आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील कचरा डेपोजवळ रात्री धारदार शस्त्राने वार करत त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.
दोघांना अटक, तिसरा पसार
या प्रकरणी घोडेगाव पोलिसांनी आरोपी मंगेश सईद, सोन्या मुकणे आणि जगन मुकणे या तिघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पैकी दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
दाराला कडी लावण्याच्या वादातून शेजाऱ्यावर चाकूहल्ला, आरोपीला अटक आणि जामीन
तरुणाला धबधब्यात बुडताना पाहून मित्रांचा पोबारा, घरी वेगळाच बनाव, अखेर तीन दिवसांनी बिंग फुटलं
एक टन काचा अंगावर पडून टेम्पो चालकाचा मृत्यू, विचित्र अपघाताने कोल्हापुरात हळहळ