पुणे : सामूहिक बलात्काराच्या घटनेने पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ (Pune Gang Rape) उडाली आहे. पतीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या विवाहितेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर गँग रेप केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. पतीसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी पीडित महिला एका हॉटेलमध्ये गेली होती, त्यावेळी तिच्या भावाचा अपघात झाला आहे, असं खोटं सांगून आरोपींनी तिला अज्ञात स्थळी नेलं, त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील पाच आरोपींना 24 तासांच्या आत ताब्यात घेण्यात आले आहे. यवत पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईनंतर आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ही घटना घडली होती.
पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील खोर गावामध्ये इनाम टेकडी परिसरातील खिंडीची वाडी भागात हा प्रकार घडला. निर्जन स्थळी नेऊन महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री साडे आठ ते अकरा वाजताच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेतील पाच आरोपींना यवत पोलिसांनी 24 तासाच्या आत ताब्यात घेतले आहे.
आपल्या पतीसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी पत्नी दौंड तालुक्यातील यवत येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेली होती. पती हॉटेलमध्ये विचारपूस करण्यासाठी गेला असता, विवाहिता बाहेर उभी होती. यावेळी आरोपींनी रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलेला तिच्या भावाचा अपघात झाला आहे, असे खोटे सांगितले.
महिलेला फसवून तिला दुचाकीवर बसवून सात किलोमीटर अंतरावर नेले. त्यानंतर एका मोकळ्या जागेत तिच्यावर पाच जणांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. याबाबत महिलेने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तिच्या फिर्यादीवरुन यवत पोलिसांनी पाच जण ताब्यात घेऊन अधिक तपास सुरु केला आहे.
संबंधित बातम्या :
‘माझ्या नादी लागाल, तर करीन 302’ म्हणणारी अखेर अटकेत! सोशल मीडियावरची गुंडगिरी भोवली
पिंपरी चिंचवडमधील तरुणाला मारहाण प्रकरण; पोलिसांनी भररस्त्यात काढली आरोपींची धिंड
आधी गोड आवाजात बोलून व्हिडीओ कॉलवर नग्न व्हायला लावले अन… ; पुणे पोलिसांनी उघड केले धक्कादायक वास्तव