10 हजारांची लाच घेताना झाडूवाल्यासह दोघे रंगेहाथ, पुणे महापालिकेत एसीबीची कारवाई

| Updated on: Oct 04, 2021 | 3:52 PM

रवी लोंढे आणि हर्षल ज्ञानेश्वर अडागळे (वय 31) अशी लाच प्रकरणात पकडण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

10 हजारांची लाच घेताना झाडूवाल्यासह दोघे रंगेहाथ, पुणे महापालिकेत एसीबीची कारवाई
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

पुणे : पुणे महापालिकेतील एका मुकादमासह झाडूवाल्याला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 10 हजार रुपयांची लाच घेताना दोघांना पकडले.

काय आहे प्रकरण?

रवी लोंढे आणि हर्षल ज्ञानेश्वर अडागळे (वय 31) अशी लाच प्रकरणात पकडण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हवालदार 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ

दुसरीकडे, अहमदनगरमध्ये पोलीस हवालदाराला 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. प्रकाश आसाराम बारवकर असं पोलीस हवालदाराचं नाव असून पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

अहमदनगरच्या बेलवंडी पोलीस ठाण्यातील मिसिंग प्रकरण बंद करण्यासाठी ही लाच मागितल्याची माहिती आहे. 22 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना पंचासमक्ष बेलवंडी पोलीस ठाण्याच्या आवारात त्याला पकडण्यात आलं. आरोपी विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी करत आहेत.

नाशिकमध्ये निवृत्त सहकाऱ्याकडून लाचेची मागणी

दुसरीकडे, निवृत्त सहकाऱ्याकडून लाच स्वीकारणारा लिपीक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. नाशिकमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयात हा प्रकार समोर आला आहे. दहा हजारांची लाच घेताना आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली.

मुख्य लिपीक प्रविण नामदेव पिंगळे आणि वरिष्ठ लिपीक लता शांताराम लहाने (बोडके) यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आपल्याच कार्यालयातील निवृत्त सहकाऱ्याकडून त्यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. मुख्य लिपीक आणि वरिष्ठ लिपीक यांना 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ अटक केली.

निवृत्त कर्मचाऱ्याकडून सेवापुस्तक पडताळणी आणी रजेच्या फरकातल्या बिलासह अन्य बिलांचे काम करुन देण्यासाठी दोघांनी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचं समोर आलं आहे.

वसईत सेवानिवृत्त ग्रंथपालाची लाचखोरी

दरम्यान, वसईतील सेवानिवृत्त ग्रंथपालाला 25 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. वसईच्या उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयातून सावकारी परवाना मिळवून देण्यासाठी त्याने पैशाची मागणी केली होती. गंगाराम जयराम जाधव (वय 70) असे रंगेहाथ अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अँटी करप्शन ब्युरो ठाणे, कॅम्प पालघरच्या युनिटने ही कारवाई केली.

सावकारी परवाना मिळण्यासाठी आपले सरकार पोर्टल मार्फत तक्रारदाराने उपनिबंधक सहकारी संस्था, कार्यालय, वसई येथे अर्ज दाखल केला होता. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी अर्जदार संबंधित कार्यालयात गेले असता आरोपी त्यांना भेटला. तक्रारदारावर प्रभाव पाडून परवान्याचे काम करुन देण्यासाठी त्याने तक्रारदाराकडे 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली आणि बाहेर हॉटेलमध्ये भेटण्यास बोलवले होते. त्यानुसार पडताळणी केली असता त्याने तक्रारदाराकडे पडताळणीच्या वेळी 25 हजार रुपयांची मागणी करुन ती रक्कम स्वीकारली. आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले असून पुढील कारवाई चालू आहे. या सापळ्यात उपनिबंधक कार्यालयातील महत्त्वाचा कोण अधिकारी आहे, याचाही तपास सुरु आहे.

नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर लाचखोरीच्या आरोपात अटक

दरम्यान, शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी 8 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून ही लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले होते. शिक्षण विभागातील मोठ्या पदावरील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्हा परिषदेत चर्चेला उधाण आलं. झनकर यांच्यासह यात वाहन चालक आणि एका प्राथमिक शिक्षकाचा सहभाग आहे.

संबंधित बातम्या :

निवृत्त सहकाऱ्याकडे लाचेची मागणी, नाशकात महिला-पुरुष लिपीक जोडगोळी रंगेहाथ जाळ्यात

नाशिक शिक्षणाधिकारी लाच प्रकरण, वैशाली झनकर यांचा जामीन अर्ज फेटाळला, आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी