बारामती : बारामती एमआयडीसी भागातील सुभद्रा मॉल, महिला हॉस्पिटल या ठिकाणाहून महागड्या दुचाकींची चोरी (Theft) करणाऱ्या ठकाला बारामती तालुका पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. तेजस कदम असं या आरोपीचं नाव असून तो स्वतः बॅंकेत कामाला असल्याचं घरात आणि परिसरात सांगत होता. प्रत्यक्षात मात्र त्यानं मोठ्या प्रमाणात दुचाकींची चोरी केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपीकडून बुलेट, यमाहा, हिरो होंडा युनिकॉर्न आणि एफ झेड आदि तब्बल 9 लाख रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात केल्या आहेत. आरोपीविरोधात भादंवि कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली. (Police arrested a thief for stealing a two wheeler in Baramati)
बारामती एमआयडीसीसह सुभद्रा मॉल आणि अन्य परिसरातून महागड्या दुचाकींच्या चोरीचे प्रमाण मागील काही दिवसात वाढले होते. त्यामुळे बारामती तालुका पोलिसांनी या चोरीबाबत तपास सुरु केला होता. या दरम्यान, इंदापूर तालुक्यातील हिंगणेवाडी येथील तेजस कदम हा बारामतीतील सुभद्रा मॉल परिसरातील पार्किंगमध्ये संशयास्पदरित्या फिरत असल्याचे पोलिसांना आढळले. त्यावरून त्याची उलटतपासणी केली असता तो महागड्या दुचाकींची चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला अटक करुन त्याची चौकशी केली असता त्याने बारामतीसह पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही दुचाकींची होरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून पोलिसांनी बुलेट, यामाहा, हिरो होंडा युनिकॉर्न आणि एफ झेड आदि आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार राम कानगुडे, पोलिस नाईक रणजित मुळीक, अमोल नरुटे, कॉन्स्टेबल प्रशांत राऊत, दत्ता मदने आणि नितीन कांबळे यांनी ही कारवाई केली.(Police arrested a thief for stealing a two wheeler in Baramati)
इतर बातम्या
Terrorist Attack : काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा आणखी एका बिगर कश्मीरीवर हल्ला