पुणे : पुणे जिल्हा हत्येच्या (Pune crime News) घटनेनं हादरुन गेला आहे. दोन दिवसांत दोन हत्या झाल्यानं नारायणगावमध्ये (Narayangaon Murder, Junnar News) खळबळ उडाली आहे. अज्ञातानं एका व्यक्तीची धारदार शस्त्रानं सपासप वार करत हत्या केली आहे. निर्घृणपणे ही हत्या करण्यात आली. संभाजी गायकवाड असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. जुन्न तालुक्यातील नारायणगावात हे धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलंय. दरम्यान, या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय. नेमकी ही हत्या (Pune Murder case) कोणत्या कारणामुळे करण्यात आली, हे आता पोलीस तपासानंतर समोर येईल. मात्र 48 तासांत दोन हत्या झाल्यानं पुण्यातील जुन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
नारायण गावच्या कुकडी नदीच्या किनारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. धारदार शस्त्रानं या व्यक्तीच्या शरीरावर वार करण्यात आल्याचं दिसून आलं. 45 वर्षीय या मृत व्यक्तीचं नाव संभाजी गायकवाड असल्याचीही माहिती समोर आली आहे. संभाजी गायकवाड हे मूळचे येणारे येथील रहिवासी आहेत.
48 तासांच्या आतच नारायणगावमध्ये आणखी हत्या झाली आहे. या हत्येनं पोलिसांसमोरची आव्हानंही वाढवली आहेत. दरम्यान, काही दिवसांआधीच नारायणगाव इथं किरकोळ वादातून गोळीबार आणि चाकूहल्ला करण्यात आला होता. दहशत माजवणारी ही घटना ताजी असतानाच आता हत्येच्या घटनेनं खळबळ उडाली आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव येथील कपिल बिअर बारमध्ये गोळीबार झाल्याचा प्रकार घडला होता. नारायणगावातील सात जणांनी दहशत निर्माण करण्यासाठी बेकायदा जमाव जमवत हा गोळीबार केलेला. गोळीबार आणि चाकूहल्ला करून आरोपी फरार झाले होते. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांसह चौदा जणांवर गुन्हा दाखल करत दोन जणांना अटक केली होती.