पत्नीचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाल्यानं पतीचा डॉक्टरवर प्राणघातक हल्ला! राजगुरुनगरमधील रुग्णालयात नातलगांची तोडफोड

| Updated on: Apr 07, 2022 | 7:35 PM

Pune Doctor Attacked by Patient relatives : एका खाजगी रुग्णालय 28 वर्षीय महिलेवर उपचार सुरु असताना तिचा मूत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून डॉक्टरला नातेवाईकांनी गंभीर मारहाण केली आहे.

पत्नीचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाल्यानं पतीचा डॉक्टरवर प्राणघातक हल्ला! राजगुरुनगरमधील रुग्णालयात नातलगांची तोडफोड
नातेवाईकांच्या हल्ल्यात डॉक्टर जखमी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पुणे : राजगुरूनगर (Rajgurunagar, Pune) येथील 28 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मुत्यू झाल्याने मयताच्या पतीने डॉक्टरवर प्राणघातक हल्ला (Attempt to murder) केल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांनी उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातलगांनी केला आहे. त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप केला जातो आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर पत्नीनं डॉक्टरवर जीवघेणा हल्ला केला. राजगुरूनगर येथील जीवनरक्षा रुग्णालयामध्ये (Jeevanraksha Hospital, Rajgurunagar) ही घटना घडली. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. एका खाजगी रुग्णालय 28 वर्षीय महिलेवर उपचार सुरु असताना तिचा मूत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून डॉक्टरला नातेवाईकांनी गंभीर मारहाण करून रुग्णालयाच्या काचा फोडल्या.

खेड पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय. या हल्ल्यानंतर डॉक्टर संघटना आक्रमक झालीये. या शेजुळ हे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर चाकण येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कशामुळे रुग्णालयात दाखल?

खेड तालुक्यातील कडुस तुरुकवाडी येथील एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. निलोफर शमसुद्दीन मोमीन असं मृत 28 वर्षीय महिलेचं नाव आहे. या २८ वर्षीय विवाहित महिलेने घरगुती कारणावरून विष प्राशन केलं होतं. उपचारासाठी चार दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

चांडोली फाटा येथील जीवनरक्षा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी या महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होते. मात्र या महिलेचा उपचारादरम्यान मुत्यू झाला. दरम्यान, रुग्ण दगावला कसा? अशी विचारणा करत नातेवाईकांनी संतप्त होऊन हॉस्पिटलमध्येच तोडफोड करण्यास सुरुवात केली. तसंच डॉक्टर रमेश शेजुळ यांच्या डोक्याला सॅनिटायझरच्या लोखंडी स्टॅन्डनं मारहाण केली. संतप्त नातेवाईकांनी यावेळी हॉस्पिटलच्या काचाही फोडल्या. मृत महिलेच्या नातलगांनी केलेल्या मारहाणीत डॉ. शेजुळ हे गंभीर जखमी झाले. डॉ. शेजुळ त्यांच्यावर चाकण येथील खाजगी रुग्णालयमध्ये उपाचार सुरु आहे.

पोलिसांकडे प्रकरण

अखेर याप्रकरणी पोलिसांतही तक्रार दाखल करण्यात आली आहे. खेड पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन घेतला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिली आहे. सध्या पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, डॉक्टरांवर झालेल्या या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डॉक्टरांच्या संघटनेनं या हल्ल्याप्रकरणाची गंभीर दखल घेत असून डॉक्टर संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय.

पुण्यात इतर महत्त्वाच्या बातम्या :

सिगारेटचे चटके देत कपडे फाडले, पुण्यात 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग

उधारी परत करण्याचा तगादा, पुण्यात 34 वर्षीय तरुणाच्या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

 पुण्यात दहशत माजवणाऱ्या कोयता गँगची धिंड? म्होरक्यासह सात जणांच्या मुसक्या आवळल्या

पाहा औरंगाबादमधील महत्त्वाची बातमी : डीजेच्या वादावारुन तुफान राडा