पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणी आज मोठी अपडेट दिलीय. अपघात झाला तेव्हा अल्पवयीन आरोपींविरोधात किती तरुण कारमध्ये होते? पबमधील पार्टीत किती तरुण होते? पबमधील तरुणांवर काय कारवाई करणार आहेत? याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. तसेच अल्पवयीन आरोपच कार चालवत होता. त्या दिवशी दोन बारमध्ये जाऊ आरोपी दारू प्यायला होता, अशी माहितीही आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आतापर्यंत झालेल्या तपास कामाचा तपशील दिला. अपघात झाला त्यावेळी कारमध्ये 4 लोक होते. पबच्या पार्टीत 7 ते 8 मुलं होती. पबच्या पार्टीतील मुलांना साक्षीदार बनवणार आहे. तसेच अल्पवयीन मुलाच्या ड्रायव्हरची साक्षही घेणार आहे, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.
मी आधीही सांगितलं होतं की, ही घटना पहाटे 2.30 वाजता घडली. त्यानंतर सकाळी 8 वाजता एफआयआर दाखल करण्यात आला. त्यात 304 अ नुसार गुन्हा दाखल केला. अधिक तपासानंतर सकाळी 11 वाजता कलम 304 लावण्यात आले. कोर्टातही 304 कलम लावण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर ज्युवेनाईल बोर्डाकडे अर्ज करून त्या मुलाला प्रौढ घोषित करण्याची विनंती केली. तसेच त्या मुलाला बाल सुधार गृहात पाठवण्याची विनंतीही केली गेली. पण आमचे अर्ज फेटाळले गेले. त्यामुळे आम्ही वरच्या न्यायालयात गेलो. वरच्या कोर्टाने पुन्हा ज्युवेनाईल बोर्डाकडे पाठवलं. बोर्डाने मुलाला बाल सुधार गृहात पाठवलंय. त्याला प्रौढ सिद्ध करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.
या प्रकरणात पोलीस किंवा काही लोकांकडून दिरंगाई झाली किंवा मॅनेज झाल्याची तक्रार येत आहे. या घटनेत जो काही कायदेशीर मार्ग शक्य होता, त्यामार्गावर पोलीस सुरुवातीपासून चालत आहेत. आम्ही या प्रकरणी कठोर कलम लावली आहेत. त्यामुळे दिरंगाई झाली किंवा दबाव आला असं म्हणणं योग्य नाही. सुरुवातीलाच 304 कलम का लावलं नाही? आरोपीला काही सुविधा पुरवण्यात आली का? याची चौकशी केली. त्यात तथ्य आढळून आलं नाही, असंही ते म्हणाले. पिझ्झा पार्टी झाल्याचं आढळून आलं नाही. पिझ्झा पार्टी झाली नाही. सुरुवातीला काही घटनाक्रम व्हायला हवा होता, काही गोष्टी झाल्या. त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आमदार ते पोलीस स्टेशनला आले होते. हे रेकॉर्डवर आहे. त्यात दुमत नाही. आमदार आले असतील, नसतील, पण पोलिसांकडून जी कारवाई झाली, ती नियमाने आणि कायदेशीर होती. आमदारांच्या दबावावरून दिशा बदलली हे सांगणं योग्य नाही, असंही ते म्हणाले.