पुणे : पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. बिबवेवाडी पोलिसांकडून दोन एजंटना अटक करण्यात आली आहे. हायप्रोफाईल रहिवासी इमारतीत चाललेल्या अनधिकृत धंद्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील बिबवेवाडी परिसरात उच्चभ्रू सोसायटीत सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा बिबवेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला. येथील दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून वेश्या व्यवसाय चालवणार्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
दोघांना अटक
महेंद्र ज्ञानाराम प्रजापती (वय 34 वर्ष, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी, मूळ गाव सोजत, जि. पाली, राजस्थान), पांडुरंग लक्ष्मण शिंदे (वय 46 वर्ष, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्या एजंटची नावे आहेत.
शिवसेनेच्या महिला नेत्याच्या घरी सेक्स रॅकेट
दुसरीकडे, आदल्याच दिवशी मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये शिवसेना नेत्या अनुपमा तिवारी यांच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. या तिवारींच्या घरातून पोलिसांनी महिला मॅनेजर, तीन ग्राहकांसह सहा जणांना अटक केली होती. यासोबतच त्यांच्या घरातून रोख रक्कमही जप्त करण्यात आली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांच्या घरात हे सेक्स रॅकेट उघडकीस आले, त्या स्वत:ला सामाजिक कार्यकर्ती असल्याचं सांगतात. त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर नगराध्यक्षपदाची निवडणूकही लढवली आहे.
संबंधित बातम्या :
अंधेरीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघींची सुटका, तिघांना अटक
नालासोपाऱ्यातील चाळीत वेश्या व्यवसाय, महिलेसह तृतीयपंथीयाला बेड्या, दोन लाखांचे कंडोम सापडले
शिवसेना नेत्याच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 4 मुलींसह 3 ग्राहकांना अटक