पुणे : पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक (Pune crime News) घटना उघडकीस आली आहे. एका 12 वर्षीय मुलीची हत्या (Murder) करण्यात आली असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांना केला आहे. चकीत करणारी गोष्ट म्हणजे 35 वर्षांच्या एका व्यक्तीसोबत लग्न करण्यास या मुलीनं नकार दिला. त्यामुळे या 12 वर्षांच्या मुलीला गळफास (Pune Murder) लावून जीवे मारण्यात आलं आणि त्यानंतर तिने आत्महत्या केली असल्याचा बनाव केला, असा गंभीर आरोप मृत मुलीच्या आई-वडिलांकडून करण्यात आलाय. पुणेकर न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे. 31 मे रोजी घडलेली ही घटना आता उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत मुलीचा मृतदेहही ताबम्यात घेतला. हा संपूर्ण खळबळजनक प्रकार शिक्रपूर इथं घडलाय. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कलम 302, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करुन घेतला आहे.
हत्या, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं, या आरोपांखाली पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी सनसनाटी आरोप केलेत. आम्हाला तिचं लग्न लावून द्यायचं नव्हतं. तिला शिकायचं होतं. ती इयत्ता सहावीत होती. पण आमच्यात नात्यातील एक व्यक्ती आमच्यावर दबाव टाकत होता. तिचं लग्न माझ्याशी लावून द्या, असं म्हणून आमच्यावर जोर जबरदस्ती केली जात होती, असा गंभीर आरोप मृत पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे.
शिक्रापूर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर मुथ्य संशयित आरोपीसह अन्य तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. पंकज काळे, वय 35 असं प्रमुख आरोपीचं नाव आहे. तर मयुर काळे, अजय काळे, हरीकन काळे अशी इतर तिघांची नावं आहेत.
पीडित मुलीच्या आईने काळीज सुन्न करणारा अनुभव सांगितला आहे. पीडित मुलीच्या आईने म्हटलंय, की पीडितेचे वडील घरी नसताना आरोपी घरात घुसले. त्यांनी तिचा जीव घेता आणि पसार झाले. आम्ही गरीब असल्यामुळे कुणीच आमची तक्रारही ऐकून घेत नाही, असा आरोप पीडित मुलीच्या आईने केलाय. तर दुसरीकडे पीडित मुलीच्या मामाने म्हटलंय की माझ्या बहिणीवर आणि त्यांच्या पतीला मुलीचं लग्न पंकजसोबत लावून देण्यासाठी जबरदस्ती केली जात होती. त्यासाठी त्यांनी दोन लाख रुपये देण्याची तयारीही ऑफरही दिली होती. पण पंकजचं आधीच लग्न झालेलं आहे शिवाय त्याला दोन मुलंदेखील आहे.
दरम्यान, या गुंतागुंतीमुळे आणि आई-वडील यांनी केलेले आरोप ऐकून एपीआय विक्रम साळुके यांनी अखेर हत्येचा गु्न्हा नोंदवून घेतलाय. त्यानंतर आता मुलीच्या पोस्टमॉर्टेमचा अहवाल येण्याची पोलिसांना प्रतीक्षा आहे. त्यानंतर या मुलीच्या मृत्यूचं कारणं नेमकं काय आहे, हे समोर येईल.