Pune Murder : दारु पिताना भांडण, मित्राची दगडाने ठेचून हत्या! पुणे पोलिसांकडून मारेकरी मित्राला अटक

| Updated on: Aug 09, 2022 | 8:18 AM

Pune Murder News : अनिल सासी याचा लहान भाऊ अक्षय सासी (25) यानं याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अक्षयने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली.

Pune Murder : दारु पिताना भांडण, मित्राची दगडाने ठेचून हत्या! पुणे पोलिसांकडून मारेकरी मित्राला अटक
पुण्यात हत्याकांड
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पुणे : दारु पिताना भांडण होऊन मित्रानेच मित्राला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क दगडाने ठेचून मित्राने आपल्यासोबत दारु पित असलेल्या मित्रावर हल्ला (Pune crime news) केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मित्रावर रुग्णालयात (Sasoon Hospital Pune) उपचार सुरु होते. पण अखेर उपचारादरम्यान, जखमी मित्राचा मृत्यू झाला. या नंतर पोलिसांनी (Pune Police News) खुनाचा गुन्हा दाखल करुन घेत मारेकरी मित्राला अटकही केली आहे. या हत्याकांडाने पुणे हादरुन गेलंय. 30 वर्षीय इसमाचा खून करण्यात आल्या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या मित्राला ताब्यात घेतलं आहे. आता मारेकरी मित्राची पोलिसांकडून कसून चौकशी केली जातेय. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत पुढील कारवाई केली आहे. उपचारादरम्यान, मृत्यू झालेल्या तरुणाच्या भावाने पोलिसांमध्ये हत्येची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

क्षुल्लक वाद

अनिल सासी असं उपचारादरम्यान, मृत्यू झालेल्या तरुणाचं नावं आहे. अनिल सासी मोची असून त्याचं वय 30 वर्ष होतं. तो प्रवीण नाईक या 41 वर्षांच्या आपल्या मित्रासोबत दारु पित असताना क्षुल्लक कारणावरुन त्यांच्याच वाद झाला. वाद इतका विकोपाला गेली की रागाच्या भरात अनिल सासी यांच्यावर प्रवीणने दगडाने गंभीर घाव घातले. यात अनिल रक्तबंबाळ झाला होता.

हे सुद्धा वाचा

जीवघेणा हल्ला

हडपसर पोलीस ठाण्याचे वरीष पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी या हत्याकांडप्रकरणाची माहिती दिली आहे. केशवनगर इथून आरोपी प्रवीण नाईक याला अटक करण्यात आली असून पुढील चौकसी केली जाते आहे. अनिल आणि प्रवीण वैदूवाडी कॅनल इथं दोन ऑगस्टला दारु पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यात भांडण होऊन प्रवीणने अनिलचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आली आहे.

आरोपीला अटक

अनिल सासी याचा लहान भाऊ अक्षय सासी (25) यानं याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अक्षयने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. गेले काही दिवस गंभीर जखमी झालेल्या अनिलवर ससून रुग्णालयात उपचार सुरु होतं. पण रविवारी उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली. यानंतर अखेर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन घेत प्रवीण नाईक या 41 वर्षीय मारेकरी मित्राला पोलिसांनी अटक केली आहे.