पुणे : किशोर वयात येणाऱ्या मुलींची अधिकच काळजी घ्यावी लागते, एका अज्ञात जगाची त्यांना ओळख करुन द्यावी लागते, याबाबतीत सर्वच पालक जागृत असतात असं नाही. तर थेट मुलींमध्येच ही जागृती करण्यात येते. मुलींना काय वाईट आणि काय चुकीचे आणि त्यावर वेळीच कसा आवाज उठवायला हवा, नको म्हणण्याचं धाडस कसं मुलींमध्ये आणता येईल हे सर्व काही मुलींना शिकवल जातं. यासाठी अनेक शाळा आपल्या शाळांमध्ये प्रशिक्षण आयोजित करत असतात. पुण्यातील एका शाळेत मात्र एक धक्कादायक प्रकरण यामुळे समोर आलं. या मुलीने दिलेल्या जबाबावरुन आरोपीला अटक करण्यात आली आहे. पण शोषण करणारे हे कोण असू शकतात याचा तुम्ही अंदाज न बांधलेलाच बरा.
पुण्यातील या एकूण प्रकरणातून हा अंदाज तुम्हाला बांधता येईल की, मुलींचं शोषण या ठिकाणी तसेच या व्यक्तीकडूनही होवू शकतं.पुण्यातील हा धक्कादायक प्रकार ऐकून शिक्षकांसह अनेक पालकांचे डोळे चकाकले आहेत. हे पुण्यातच नाही, तर कोणत्याही शहरात आणि जगात कोणत्याही ठिकाणी हे घडू शकतं. मुलीने अचानक दिलेल्या या जबाबावरुन आरोपीला मात्र अटक करण्यात आली आहे.हा घाणेरडा स्पर्श करणारा व्यक्ती कुणीही असू शकतो.
वयात येण्याआधी मुलींना चांगला स्पर्श आणि घाणेरडा स्पर्श याविषयी शिकवलं जातं, एका शाळेने हे प्रशिक्षण आयोजित केलं होतं.शाळेत मुलींना कोणत्या जागी आणि कोणत्या ठिकाणी केलेला स्पर्श हा चुकीचा असतो, हे शिकवलं जात होतं. Good and Bad Touch या विषयी माहिती दिली जात होती, सर्व मुलींना हा विषय नवीन असल्याने ते आश्चर्य़ाने हा विषय ऐकत होत्या.
चांगला आणि घाणेरडा स्पर्श या विषयी शिकवलं जात असताना, एक ११ वर्षांची मुलगी उठली आणि आपले आजोबा आपल्यासोबत जे करतात, घाणेरडा स्पर्श आहे, तुम्ही सांगत असल्याप्रमाणेच ते करतात, असं तिने सांगितलं आणि अखेर शिक्षकांनाही पोलिसांना बोलवावं लागलं, अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.