पुणे : पुणे जिल्ह्यात वाहनांची चोरी (Car theft in Pune) आणि घरफोड्या करणाऱ्यांनी (Pune Robbers) धुमाकूळ घातलाय. अशातच पुणे जिल्ह्यातील चोरट्यांचं धाबं (Pune crime News) दणाणून सोडणारी एक कारवाई समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील भिगवण पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे. पुणे जिल्ह्यात शिकलकर टोळीनं हैदोस घातला होते. पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात घरफोड्या करायच्या, कार चोरायच्या अशा आरोपांखाळी या टोळीवर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. जवळपास 40 गुन्हे दाखल करण्यात आलेल्या या टोळीच्यी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईने शिकलकर टोळीला मोठा दणका बसला. घरफोड्या करणाऱ्या टोळ्यांना आता या कारवाईमुळे जरब बसले, असं विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जातो आहे. तिघांना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून आता तिघांचीही कसून चौकशी केली जाते आहे. त्यांनी केलेल्या चोऱ्यांची माहिती आता पोलिसांकडून काढली जाते आहे. तसंच मुद्देमाल पुन्हा मिळवण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलिसांनी चोरट्यांवर कारवाई केली. शिकलकर टोळीच्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या टोळीवर आतापर्यंत पुणे शहरासह, पिंपरी, चिंचवड, इंदापूर, भिगवण आणि हवेली परिसरात चोरी केल्याचा, घरफोड्या केल्याचा गंभीर आरो आबे. इतकंच काय तर या टोळीवर 40 हून अधिक गुन्हे नोंदवण्यात आले होते. अखेर भिगवण पोलिसांनी तुळजापूर पोलिसांच्या मदतीने या टोळीवर कारवाईचा बडगा उगारला आहे. भिगवण पोलिसांनी केलेली आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी कामगिरी असल्याचंही बोललं जातंय.
तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पोलिसांनीहीह दरोडा घालण्याच्या तयारी असलेल्या एका टोळीचा पर्दाफाश केलाय. या टोळीकडून तब्बस 1 कोटी 53 लाख 98 हजार 100 रुपयांचे 197 अॅपल कंपनीचे मोबाईल जप्त केले आहेत. या चोरट्यांनी रविवारी घोली परिसरातील प्रो कनेक्ट सप्लाय चेन सोल्युशन लिमीटेड कंपनीचे गोडावून मधून चोरी केल्याची कबुलीदेखील दिलीय.
अब्दुल हाय अबुजार शेख (वय-20 रा. मु.बोलटोला, जि. साहेबगंज, झारखंड सध्या रा. चाकण), अबेदुर मुफजुल शेख (वय-34 रा. मु. मुंजुरटोला, जि. साहेबगंज, झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत तर सुलतान अब्दुल शेख (वय-32 रा. मु. इब्राहिमटोला, रा. साहेबगंज), अबुबकर अबुजार शेख (वय-23 रा. मु. उत्तर पियारपुर जि. साहेबगंज, सध्या रा. चाकण), राबीवुल मुंटु शेख (वय-22 रा. मु. पियारपुर, जि. साहेबगंज, झारखंड सध्या रा. चाकण) हे अंधाराचा फायदा घेऊन फरार झालेत. फरार आरोपींचा शोध लोणीकंद पोलिसांकडून केला जातोय.