Pune crime : मित्र आहोत म्हणत ससून रुग्णालयात घुसले आणि मग गोळीबार! ससून रुग्णालयातील थरारनाट्य

| Updated on: Sep 06, 2022 | 12:24 PM

तुषार हंबीर हा खून, मारामारी आणि इतर अनेक गंभीर गुन्ह्यांसाठी गेल्या दहा वर्षापासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करत येरवडा कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली होती. यापूर्वीही तुषार हंबीर याच्यावर येरवडा कारागृहात हल्ला झाला होता.

Pune crime : मित्र आहोत म्हणत ससून रुग्णालयात घुसले आणि मग गोळीबार! ससून रुग्णालयातील थरारनाट्य
ससून रुग्णालयात हल्ला
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयात (Pune Sasoon Hospita;) एका आरोपीवर चार जणांकडून हल्ला (Pune Attack) करण्यात आला. आज सकाळी करण्यात आलेल्या या हल्ल्याच्या घटनेने ससून रुग्णालयात खळबळ उडाली. विशेष म्हणजे पोलीस संरक्षणात (Police Protection) उपाचारासाठी ज्या आरोपीला रुग्णालयात आणण्यात आलं होतं, त्यावर हल्ला करण्यात आला. आधी गोळीबार, त्यानंतर कोयत्याने वार, असा थरारक हल्ला करण्यात आला. या प्राणघातक हल्ल्याचा थरारक घटनाक्रमच पोलिसांनी सांगितलंय.

असा झाला हल्ला

पुण्यातील ससून रुग्णालयात एका कुख्यात आरोपीवर हल्ला झाला. या आरोपीचं नाव तुषार हंबीर असं आहे. तुषार हंबीर हिंदू राष्ट्र संघटनेचा अध्यक्ष म्हणूनही ओळखला जातो. हिंदू राष्ट्र संघटनेचा अध्यक्ष तुषार हंबीर या आरोपीवर 4 ते 5 जणांनी हल्ला केला. आधी या अज्ञात आरोपींनी रुग्णालयातच गोळीबार करण्याचा प्रयत्न केला पण तो त्यांचा प्रयत्न फसला. यानंतर त्यांनी कोयत्याने तुषार हंबीर याच्यावर हल्ला केला. त्यात तुषार हंबीर हा गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

हल्लेखाओर कोयत्याने प्राणघातक हल्ला करत असताना पोलिस कर्मचारी अमोल बगाड यांनी हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीमध्ये अमोल बगाड हे पोलीस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले.

हे सुद्धा वाचा

कोण आहे तुषार हंबीर?

तुषार हंबीर हा खून, मारामारी आणि इतर अनेक गंभीर गुन्ह्यांसाठी गेल्या दहा वर्षापासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करत येरवडा कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली होती. यापूर्वीही तुषार हंबीर याच्यावर येरवडा कारागृहात हल्ला झाला होता, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान हंबीर याची तब्येत बिघडल्याने दहा दिवसांपूर्वी तब्बेत हंबीर याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केलं होतं. आणि त्यातच या चार जणांनी हंबीरचे आम्ही मित्र आहोत, म्हणत ससून रुग्णालयात प्रवेश केला. त्यानंतर वेळ साधून त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोर आरोपींनी रुग्णालयातून नंतर पळ काढला. सध्या फरार हल्लेखोर आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी म्हटलंय. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर यंत्रणांच्या मदतीने पोलिसांकडून आरोपींना पकडण्यासाठी पथकंही तैनात करण्यात आली आहे.