‘डेटिंगसाठी मुलगी हवी आहे का’ विचारत वृद्धाला लुटले, सांस्कृतिक शहरातील धक्कादायक प्रकार

| Updated on: Nov 11, 2022 | 2:12 PM

पुण्यातील वारजे परिसरात राहणारे 79 वर्षीय वृद्ध व्यक्ती बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना डिसेंबर 2021 मध्ये एका अनोळखी नंबर वरुन श्रेया नावाच्या मुलीचा फोन आला. तिने 'डेटिंगसाठी मुलगी हवी का' असे विचारले.

डेटिंगसाठी मुलगी हवी आहे का विचारत वृद्धाला लुटले, सांस्कृतिक शहरातील धक्कादायक प्रकार
पुण्यात वृद्धाला 17 लाखाला लुटले
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : डेटिंगसाठी मुलगी हवी आहे का म्हणत एका 79 वर्षीय वृद्धाला लुटल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही फसवणुकीची घटना डिसेंबर 2021 पासून जून 2022 दरम्यान घडली आहे. पोलीस अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.

डिसेंबरमध्ये अनोळखी नंबरवरुन तरुणीचा फोन आला

पुण्यातील वारजे परिसरात राहणारे 79 वर्षीय वृद्ध व्यक्ती बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना डिसेंबर 2021 मध्ये एका अनोळखी नंबर वरुन श्रेया नावाच्या मुलीचा फोन आला. तिने ‘डेटिंगसाठी मुलगी हवी का’ असे विचारले.

वृद्धाला काही रक्कम भरण्यास सांगितले

यानंतर तिने वृद्ध व्यक्तीला काही रक्कम भरा असे सांगितले. काही रक्कम भरल्यानंतर या व्यक्तीला नेहमी त्या नंबरवरुन फोन येत होते. त्यानंतरही आरोपीने पैशाची मागणी केली.

हे सुद्धा वाचा

वृद्धाची तब्बल 17 लाखांची फसवणूक

तब्बल सात महिने या वृद्ध व्यक्तीने आरोपीच्या वेगवेगळ्या बँक खात्यात 17 लाख रुपये भरले. मात्र नंतर समोरील व्यक्ती आपल्याकडून पैसे लुबाडत आपली फसवणूक करत असल्याचे वृ्द्धाच्या लक्षात आले. त्यानंतर वृद्धाने वारजे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

वृ्द्धाच्या तक्रारीनुसार वारजे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

पुण्यात अशा घटनांमध्ये वाढ

पुण्यात सध्या आशा घटनांमध्ये मोठी वाढ झालेली पहायला मिळत आहे. पुणे शहरात दररोज 70 सायबर गुन्ह्यांची नोंद होत असून, गेल्या 9 महिन्यात जवळपास 17 हजार सायबर गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.