पुणे / 9 ऑगस्ट 2023 : मुंबईत मंत्रालायातील धमकीचा फोनची घटना ताजी असतानाच आज पुण्यात धमकीचा मेल आला आहे. फिर्यादी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात असतानाच त्याला हा धमकीचा मेल आला. याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या मेलबाबच सखोल तपास करत आहेत. “मी भारतामध्ये सिरीयस बॉम्ब ब्लास्ट करण्याचा प्लॅन करत आहे, मी हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातील महिलांना नष्ट करेन” अशा आशयाचा हा मेल आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याचीही धमकी देण्यात आली होती. Mokheem1 508@gmail.com या मेल आयडीवरून ही धमकी आली. धमकी आल्याचे कळताच एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी कुणी दिली याचा पोलीस शोध घेत आहेत.
फिर्यादी व्यक्ती पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात आली होती. यावेळी त्याच्या मोबाईलवर Mokheem1 508@gmail.com या आयडीवरुन अज्ञात व्यक्तीचा एक मेल आला. या मेलमध्ये “मी भारतामध्ये सिरीयस बॉम्ब ब्लास्ट करण्याचा प्लॅन करत आहे, मी हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातील महिलांना नष्ट करेन” असे म्हटले होते. तसेच आय विल किल नरेंद्र मोदी अल्सो, असे लिहिले होते. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. मेल आयडीवरुन अज्ञात आरोपीचा शोध सुरु आहे.
मुंबईतील मंत्रालयात नियंत्रण कक्षाला सोमवारी रात्री धमकीचा फोन आला होता. यानंतर एकच खळबळ उडाली होती. मुंबईत दहशतवादी कारवाया घडवण्याची धमकी फोनद्वारे देण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी जेष्ठ नागरिक असून, मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने असे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले.