खेड : मंचर पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदारा (Assistant Police Inspector)ने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना खेड तालुक्यातील चांडोली येथे आज दुपारी उघडकीस आली आहे. एकनाथ ठकाजी वाजे असे आत्महत्या करणाऱ्या फौजदाराचे नाव आहे. वाजे यांनी आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. याबाबत त्यांचे जावई आदित्य रवींद्र गभाले यांनी खेड पोलीस (Khed Police) ठाण्यात खबर दिली. वाजे यांच्या मुलीचा पाच दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. घोडेगाव येथील एका कार्यालयात हा विवाह पार पडला. हा प्रेम विवाह असल्याची माहिती मिळत असून मुलीच्या आग्रहाखातर वाजे यांनी करून दिला होता. मात्र विवाहानंतर पाच दिवसातच हा प्रकार घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सहायक फौजदार वाजे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पत्नी 23 मे जी माहेरी चांडोली ता. खेड येथे आई-वडिलांकडे पहिल्या बोळवनीसाठी आली होती.त्यानंतर दोन दिवसांनी फिर्यादीच्या पत्ने तिचा पती यास फोन करुन वडिल एकनाथ वाजे यांनी शेजारी असणाऱ्या मोकळ्या फ्लॅटमध्ये स्वतःला कोंडून घेतले असून आम्ही बराच वेळ दरवाजा वाजवूनही ते दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. आतून कुठलाही आवाज येत नसल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत जाऊन पाहिले असता एकनाथ वाजे यांनी बेडरुममधील हुकाला रस्सी बांधून गळफास घेतल्याचे दिसून आले.
एकनाथ वाजे यांचा गळफास सोडून त्यांना खाली घेऊन बाजूला असलेल्या ग्रामीण रुग्णालय चांडोली येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वाजे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून याबाबत खेड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत. मंचर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक फौजदार एकनाथ वाजे यांच्या मृत्यूची बातमी कळताच मंचर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. (Suicide by strangulation of a police for unknown reasons in Khed Pune)