Pune DSK : 3 दिवसांत डीएसकेंना दुसरा जामीन! तरिही जेलमध्ये राहावं लागणार, नेमकं काय प्रकरण?

| Updated on: Jul 27, 2022 | 7:25 AM

सुप्रीम कोर्टात जामीनासाठी अर्ज केलेला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी पार पडली.

Pune DSK : 3 दिवसांत डीएसकेंना दुसरा जामीन! तरिही जेलमध्ये राहावं लागणार, नेमकं काय प्रकरण?
डीए कुलकर्णी
Image Credit source: Twitter
Follow us on

पुणे : पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी ए कुलकर्णी (DS Kulkarni) यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन (Bail Application in Supreme Court) अर्ज मंजूर केला असल्याकारणाने डी ए कुलकर्णी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र त्यानंतर ते जेलमधून बाहेर येण्याची शक्यता कमीच आहेत. कारण त्याच्याविरोधात इतरही चार ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या गुन्ह्यांखाली त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना जामीन मिळालेला असला तरिही त्यांना कोठडीत राहावं लागणार आहे. मंगळवारी सुप्रीम कोर्टात डीएसकेंच्या (दीपक सखाराम कुलकर्णी) जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) निर्णय देत अखेर डीएसकेंना जामीन मंजूर केला. दरम्यान, गेल्या चार पेक्षा जास्त वर्ष झाले दीपक सखाराम कुलकर्णी हे कोठडीच आहेत. ठेवीदारांनी केलेल्या गुंतवणुकीत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंचर चार वर्षांनी डीएसके यांना अल्पसा दिलासा मिळालाय.

कोर्टात काय घडलं?

डीएसके यांनी एडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव आणि रितेश येवलेकर यांच्या मार्फत सुप्रीम कोर्टात जामीनासाठी अर्ज केलेला. त्यावर मंगळवारी सुनावणी पार पडली. राज्य सरकारला या जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. राज्य सरकारनं डीएसकेंच्या जामीनाला विरोध केलेला. दरम्यान, अद्याप डीएसकेंवरील दोषारोप निश्चित झालेले नाही. तसंच त्यांची बँक खाती, संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे. आणि अद्याप खटल्यालाही सुरुवात झालेली नसल्यानं त्यांच्या जामीन अर्जावर योग्य तो विचार करावा, असा युक्तिवाद डीएसकेंच्या वकिलांमार्फत करण्यात आला होता.

तरीही जेलमध्ये राहावं लागणार?

महाराष्ट्र सदनिका मालकीहक्क कायद्याखाली देखील डीएसकेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्याखाली देखील डीएसकेंना नुकताच जामीन मंजूर करण्यात आलेला होता. पुणे सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केला होता.

हे सुद्धा वाचा

महत्त्वाचं म्हणजे ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके यांच्यावर मुंबईसह कोल्हापूर सांगली आणि पुण्यातही गुन्हे दाखल आहे. व्हॅट प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये अद्याप डीएसके यांना जामीन मिळालेला नाही. जोर्यंत या गुन्ह्यांमध्ये त्यांना जामीन मिळत नाही, तोपर्यंत ते तुरुंगातून बाहेर येणार नाही, असं बचाव पक्षातर्फे सांगण्यात आलंय.