पुणे : गेल्या अनेक दिवसात पुण्यातल्या रस्त्यावर तलवारी (Sword) नाचवण्यात अल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. हे कमी होतं म्हणून आता एक असा प्रकार समोर आलाय ज्याने पुन्हा पोलिसांची (Pune Police) डोकेदुखी वाढली आहे. यावेळी पुण्यात चक्क कुरिअरने (Courier) तलवारी मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या कुरिअरने मागलेल्या तलवारी पुणे पोलिसांनी जप्त केल्या आहेत. स्वारगेट पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या तलवारी पंजाबमधील लुधयानावरून आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने पुढील तपास सुरू केला आहे. याचे धागेदोरे आता लुधियानापर्यंत निघाल्याने आता पुणे पोलिसांचा तपास लुधियाना पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आता तलवारी मागून कुणाचा पुन्हा दहशत पसरवण्याचा उद्देश होता? याचा शोध आता पुणे पोलीस घेत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात अनेक हिंसक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यावेळी या तलवारी मागवण्याचा उद्देश काय होता? हे शोधणं आता पुणे पोलिसांसमोरील आव्हान असणार आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात पुण्यात एका टोळीने रस्त्यावर तलवारी आणि कोयते नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरानंतर पुणेकरांमध्ये मोठी दहशत पसरली होती. पुण्यातलं टोळी युद्ध हे महाराष्ट्रताली सर्वांनाच परिचित आहे. त्यामुळे कोणत्या टोलीने या तलावीर मागवल्या होत्या का? याचाही शोध आता पुणे पोलीस घेत आहेत.
सय्यदनगरमध्ये गल्ली नं 11 व 12 मध्ये रस्त्यावर स्थानिक लँड माफिया गुंडांच्या टोळीने रात्रीच्या सुमारास तलवारी कोयते नाचवत वाहनांची तोडफोड करत चांगलाच नंगानाच केला. सय्यदनगर परिसरात आपल्या टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी 20 ते 22 गुंडांनी घरांमध्ये घुसून महिला व लहान मुलांना मारहाण केली तर पुण्यातील मंगळवार पेठेतील मुजिफ तांबोळी हा तरुण व्यापारी टीव्ही स्पेअर पार्टसचे बिल देण्याकरीता आला होता. त्याच्यावर कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केले आणि त्याच्याजवळ असलेले 27 हजाराची रक्कमही या गुंडांच्या टोळक्याने लुटली होती. या प्रकारानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. आता पुन्हा तलवारी सापडल्याने पुन्हा तपासाची सुत्रं हालू लागली आहेत.
दरोडेखोराचा फिल्मी स्टाईल पाठलाग, जखमी होऊनही पोलिसाने गचांडी धरलीच, कसारा घाटात थरारनाट्य