पुणे शहर गुन्हेगारीचा हॉटस्पॉट होत असताना दिसत आहे. दिवसेंदिवस पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतेय. पुण्यामध्ये आजही एका महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. बाणेर-पाषाण लिंक रोडवर महिलेला ओव्हरटेक करत तिच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित महिला एक डिजिटल कंटेंट क्रिएटर असून हल्ला झाला त्यावेळी तिच्यासोबत दोन मुलेही होतीत. महिलेने या घटनेनंतर एक व्हिडीओ शुट करत आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे.
जेरीलन डिसिल्वा असं महिलेचं नाव आहे. बाणेर-पाषाण लिंक रोडवर गाडीवरून आपल्या दोन मुलांसह चालल्या होत्या. त्यावेळी हल्ला करणाऱ्याने त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी डिसिल्वा यांनी त्याला जागा देत गाडी बाजूला घेतली. मात्र कार चालकाने गाडी थांबवली आणि डिसिल्वा यांच्या चेहऱ्यावर बुक्का मारला. यामुळे त्यांच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव होऊ लागला.
Jeryln Dsilva, a digital content creator from Pune, was violently assaulted today while driving on the Baner-Pashan Link Road.
She documented her harrowing experience in an Instagram video, expressing her concern over the safety of women and bikers in Pune given such aggressive… pic.twitter.com/zmryYmkbZj— Pooja_1010 (@Dabbu_1010) July 20, 2024
हल्ला करणारा वृद्ध व्यक्ती असून तो वेगाने गाडी चालवत असल्याचं जेरीलन डिसिल्वा सांगितलं. महिलेने आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला असून महिला आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली. डिसिल्वा यांच्यावर बाणेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोराने २ किलोमीटरपासून आपला पाठलाग केल्याचं महिलेने म्हटलं आहे.
दरम्यान, हल्ला करणारा आरोपी कोण होता? त्याने जेरीलन डिसिल्वा यांच्यावर का हल्ला केला? पुणे पोली या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र अशा घटनांमुळे पुणे पोलिसांचा गुन्हेगारांना काही धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भर दिवसा असे हल्ले होत असतील तर रात्रीच्या वेळी महिलांनी बाहेर पडावं की नाही असे अनेक प्रश्न निर्माण होतात.