पुणे : आपल्या पुण्याला (Pune) एक जागतिक दर्जा आहे. पुणे शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओखळले जाते. भारतातीलच नाही तर जगातील मोठ्या शहरात आता पुण्याची गणना होते. त्यामुळे पुण्याला एक वेगळाच मान आहे. मात्र आपल्या याच पुण्यात मान शरमने खाली घालायला लावणारी घटना घडली आहे. तसेच ही घटना तेवढा संताप आणणारीही आहे. कारण पुण्यात आजच्या अधुनिक युगातही हुंडाबळीचा (Pune dowry case) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुन्हा हादरून गेले आहे. एका विवाहितेने चक्क इमारतीवरून उडी मारून जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Police) लगेच अॅक्शन मोडमध्ये येत सासरच्यांवर कारवाईला सुरूवात केली आहे. यात काही जणांना अटकही करण्यात आली आहे.
पुण्यात सासरच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणीची 11 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याने पुन्हा खळबळ माजली आहे. सासरी हुंड्यासाठी होणाऱ्या जाचाला कंटाळून राहत्या घराच्या 11 व्या मजल्यावरून उडी घेत केली असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास हंडेवाडी येथील नवरत्न एक्झॉटिका सोसायटीत ही घटना घडली आहे. दिव्या करून कानडे असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. तर याप्रकरणी मयत विवाहितेचा पती तरूण मदन कानडे , सासरा मदन कानडे या दोघांना अटक तर सासू सपना कानडे आणि दिर अरुण कानडे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने आता त्यांच्याही अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. या प्रकरणी शामराव आनंदा बनसोडे यांनी पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्यात दिली तक्रार दिली.
गेल्या काही दिवसात राज्यात विविध ठिकाणी असे अनेक प्रकार घडले आहेत. पूर्वीसारखे असे अमानुष प्रकार घडू नये, यासाठी शासनाने अनेक कायदेही केले आहेत. तरीही असे प्रकार थांबवण्याचे नावही घेत नाहीत. यामुळे अनेक मुलींचे वडील कर्जबाजारी झाले आहेत. मात्र आजही काही ठिकाणी सासरच्या मंडळींची अमानुष भूक संपायचे नाव घेत नाहीत. असे प्रकार थांबवायचे असल्यास याविरोधातील कायद्यांची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अन्यथा असे प्रकार वारंवार अस्वस्थ करत राहतील. त्यासाठी प्रशासनापासून ते नागरिकांपर्यंत सर्वांनी आपली मानसिकता बदलण्याचीही खूप मोठी गरज आहे. तरच अशा प्रकारांना आळा बसले.