Gajanan Marne | गजा मारणे एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध; एमपीडीएही लागणार

| Updated on: Mar 07, 2021 | 2:24 PM

कुख्यात गुंड गजा मारणेला (Gajanan marne) एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी गजा मारणेविरोधात एमपीडीएचा प्रस्ताव दिला.

Gajanan Marne  | गजा मारणे एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध; एमपीडीएही लागणार
Gajannan Marne
Follow us on

पुणे : कुख्यात गुंड गजा मारणेला (Gajanan marne) एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी गजा मारणेविरोधात एमपीडीएचा प्रस्ताव दिला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे त्याला एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गजा मारणेला स्थानबद्ध केलं आहे (Gajanan Marne Sentenced To One Year Jail In Yerawada Jail).

अखेर गजा मारणेला सातारा पोलिसांच्या बेड्या

गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेला कुख्यात गुंड गजा मारणेला सातारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मेढा पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करुन गजा मारणेला जेरबंद केलं. क्रेटा गाडीतून त्याची जावळी-महाबळेश्वरात हवा चालली होती. अखेर सातारा पोलिसांना त्याची चाहूल लागताच पोलिसांनी अगदी शिताफीने त्याला बेड्या ठोकल्या. गजा मारणेवर खून, मारामारी, खंडणी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद आहेत.

पुणे पोलिसांना गुंगारा देऊन त्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला होता. गेल्या अनेक दिवस पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर साताऱ्याच्या जावळी तालुक्यातून गजा मारणेला मेढा पोलिसांनी अटक केली आहे.

पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. या मिरवणुकीत जवळपास 300 गाड्या होत्या. ही मिरवणूक त्याला महागात पडली. त्याच्यावर याप्रकरणी पुण्यातील कोथरुड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

याचप्रकरणी त्याला पुणे कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर त्याच्यावर पुन्हा पुणे, पिंपरी चिंचवड आणि खालापूर पोलिसांत गुन्हे दाखल झाले. तेव्हापासून गजा मारणे फरार होता. पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. पण तो पोलिसांना मिळत नव्हता. अखेर सातारा जिल्ह्यात गजा मारणे आल्याची माहिती पोलिसांनी मिळताच मेढा पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडले .(Gajanan Marne Sentenced To One Year Jail In Yerawada Jail)

जंगी मिरवणूक मगाहात पडली होती

पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. या मिरवणुकीत जवळपास 300 गाड्या होत्या. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. तसेच उर्से टोल नाक्यावर गजा मारणे याने टोल न भरणे तसंच दहशत पसरवणे तसं वातावरण तयार करणे, असे गुन्हे मिरवणुकीनंतर गजा मारणेवर दाखल झाले. एकंदरित ही मिरवणूक त्याला चांगलीच महागात पडली.

Gajanan Marne Sentenced To One Year Jail In Yerawada Jail

संबंधित बातम्या :

गजा मारणेच्या नऊ साथीदारांना बेड्या, हिंजवडी पोलिसांची धडक कारवाई

गजा मारणेच्या अडचणीत वाढ, पुणे पोलीस मोक्का लावणार

गजा मारणे टोळीनंतर नीलेश घायवळ टोळी पोलिसांच्या रडारवर