पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या झाली. 5 जानेवारी 2024 ला दुपारी दीड वाजता शरद मोहोळला त्याचाच साथीदार मुन्ना पोळेकर याने संपवलं. अवघ्या 20 वर्षाच्या पोराने त्याला चाहुलही लागून न देता सोबत राहून एक दिवस काटा काढला. मुन्ना पोळेकर याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने गोळ्या घालून मोहोळची हत्या केली. मोहोळ याचा जाग्यावरच मृत्यू झाला होता. मोहोळच्या हत्येमध्ये कोण-कोण सहभागी आहेत याचा तपास पोलीस करत आहे. शरद मोहोळ याच्यावरही हत्या, हत्येचा प्रय्तन, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. मोहोळ टोळीचा मुख्य सुत्रधार (सँडी) संदीप मोहोळ याच्या हत्येनंतर शरद मोहोळ टोळीचा मुख्य म्होरक्या झाला होता. शरद मोहोळने आपल्या सख्या चुलत भावाच्या हत्येचा बदला अत्यंत क्रूर पद्धतीने घेतलेला. पुणे त्यावेळी हादरून गेलं होतं.
मारणे आणि मोहोळ या दोन्ही टोळी आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी एकमेकांच्या टोळीतील लोकांना मारत होते. मारणे टोळीतील अनिल मारणे आणि सुधाकर रसाळ यांना संदीप मोहोळच्या टोळीने संपवलं. याचा बदला म्हणून त्यांनी मारणे टोळीने संदीप मोहोळ याला पुण्यातील पौड फाटा येथील सिग्नलवर गोळ्या घालून मारलं. भावाच्या हत्येनंतर शरद मोहोळ याच्याकडे टोळीची सूत्र आली होती. गणेश मारणे सचिन पोटे, जमीर शेख आणि संतोष लांडेसह मारणे टोळीने संदीप मोहोळ याला संपवलं. मात्र शरद मोहोळ याने आपल्या भावाच्या मर्डरचा बदला घेतलाच.
गणेश मारणे संदीप मोहोळ याला मारूण तुरूंगात गेला होता. त्यावेळी मारणे टोळीची सूत्र किशोर मारणेकडे आली होतीत. शरद मोहोळ याला एक गुप्त माहिती मिळाली. 11 जानेवारी 2010 ला किशोर मारणे ‘नटरंग’ हा मराठी चित्रपट पाहण्यासाठी पुण्यातील निलायम टॉकीजमध्ये गेला होता. शरद मोहोळने आपल्या साथीदारांच्या मदतीने सापळा रचला. किशोर मारणे चित्रपट पाहून बाहेर आल्यावर चहा प्यायला शेजारील प्लॅटिनम हॉटेलमध्ये गेला. चहा पिऊन झाल्यावर दबा धरून बसलेल्या शरद मोहोळच्या साथीदारांनी त्याला गोळ्या घातल्या. इतकंच नाहीतर त्याच्यावर कोयत्याने तब्बल 40 वार केले होते. या हत्येनेही पुणे हादरून गेलं होतं.
शरद मोहोळ आणि अमित पाठक हत्या केल्यावर ना. सी. फडके चौकाकडे पळत चालले होते. त्यावेळी रस्त्यात त्यांना एका महिला पोलीस हवालदाराने अडवलं. अमित पाठक याचं शर्ट रक्ताने माखलं होतं, महिला पोलीस आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावू लागल्यावर त्यांनी फोन हिसकावून घेत तो फोडला आणि तिथून पळ काढला.
दरम्यान, किशोर मारणे याच्या हत्येच्या खटल्याचा निकाल लागल्याव शरद हिरामण मोहोळ, अमित अनिल पाठक, दीपक गुलाब भातंमब्रेकर, दत्ता किसन गोळे, योगेश भाऊ गुरव, हेमंत पांडुरंग धाबेकर, मुन्ना ऊर्फ मुर्तझा दावल शेख यांना जन्मठेप सुनावली होती.