पिकअप बाईकचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू, त्यामध्ये दोन चिमुकल्यांचा…

| Updated on: Mar 28, 2023 | 8:32 AM

जखमींवरती जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत, शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

पिकअप बाईकचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू, त्यामध्ये दोन चिमुकल्यांचा...
Car jeep Accident
Image Credit source: tv9marathi
Follow us on

आळेफाटा : शेतीची कामे आटोपून घरी निघालेल्या शेतमजूर लोकांना भरधाव वेगाने निघालेल्या पिकअप (Pickup) जीपने जोराची धडक दिली. ज्यावेळी धडक दिली त्यावेळी अपघातस्थळी जोराचा आवाज आला. ही घटना नगर कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे घडली आहे. दुचाकीवर निघालेल्या आठ जणांना (Car jeep Accident) धडकी दिली. त्यापैकी एकाचा जागीचं मृत्यू झाला आहे. तर उपचार सुरु असताना चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. शेतीचं काम संपवून सगळे शेतमजून आपल्या पारनेर (Parner) या गावी निघाले होते अशी माहिती मिळाली आहे.

अपघातामुळे परिसर हादरला

पुणे नगर कल्याण महामार्गावर पिकअप जीप दुचाकीच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.
नारायणगाव येथुन शेतमजुरीची कामे उरकुन पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे घराकडे जात असताना शेतमजुरांना नगर कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे पिकअप जीपने दुचाकीवरील आठ जणांना जोराची धडक दिली. त्यामध्ये चिमुकल्यांसह एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान तीन असे पाच जणांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे.

रात्रीच्या अंधारात पिकअप जीपने चिरडले

दोन चिमुकली, दोन पुरुष, एक महिला यांचा समावेश आहे. मृत्यु झालेले सर्व शेतमजुर असून शेतमजुरीचे काम संपवुन सर्व पारनेर तालुक्यातील गावाला जात असताना रात्रीच्या अंधारात पिकअप जीपने चिरडल्याची घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

जखमींवरती जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत, शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. गाडी चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गाडी चालकाची कसून चौकशी करण्यात येणार आहे.