Pune Crime : हॉस्टेल कर्मचाऱ्याकडून छेडछाड अन् रुममेटकडूनही त्रास, १९ वर्षीय विद्यार्थिनीने स्वतःला पेटवलं…

| Updated on: Mar 20, 2024 | 10:53 AM

पुण्यातून एक अतिशय खळबळजक वृत्त समोर आलं आहे. हॉस्टेल कर्मचाऱ्याकडून छेडछाड आणि रूममेटही त्रास देत असल्यामुळे कंटाळून एका विद्यार्थिनीने स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. पुण्यातील कात्रज परिसरात हा अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे

Pune Crime : हॉस्टेल कर्मचाऱ्याकडून छेडछाड अन् रुममेटकडूनही त्रास, १९ वर्षीय विद्यार्थिनीने स्वतःला पेटवलं...
Follow us on

पुणे | 20 मार्च 2024 : पुण्यातून एक अतिशय खळबळजक वृत्त समोर आलं आहे. हॉस्टेल कर्मचाऱ्याकडून छेडछाड आणि रूममेटही त्रास देत असल्यामुळे कंटाळून एका विद्यार्थिनीने स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. पुण्यातील कात्रज परिसरात हा अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजच्या हॉस्टेलमध्येच या विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेत आयुष्य संपवलं. तिच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते, मात्र तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि तिने अखेरचा श्वास घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, 7 मार्च रोजी भारती विद्यापीठ मधील इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये हा अतिशय दुर्दैवी प्रकार घडला. पीडित विद्यार्थिनी ही 19 वर्षांची असून या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये रहात होती. मात्र हॉस्टेलच्या कँटीनमधील कर्मचाऱ्याकडून तिची छेड काढण्यात होती, त्यामुळे ती त्रस्त झाली होती. त्यातच भर म्हणून पीडित विद्यार्थिनीच्या रूममेट कडूनही तिला त्रास देण्यात येत होता. या सर्व प्रकारामुळे पीडित विद्यार्थिनी अतिशय वैतागली होती, खटली होती. अखेर तिने स्वत:चं आयुष्यचं संपवण्याचा निर्णय घेतला. तिने हॉस्टेलमध्येच स्वत:ला पेटवून घेतलं, ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अखेर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.