पुणे : आपला वाढदिवस हा मोठ्या उत्साहात आणि आठवणीत राहील असं अनेकांना वाटत असतं. त्यासाठी अनेक जण वाढदिवस करण्यासाठी काही शक्कल लढवत असतात. अशीच एक शक्कल लढविणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. वाढदिवस साजरा करून फोटो शेयर करणं एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. विशेष म्हणजे आठवणीत राहील असाच वाढदिवस साजरा झाल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात ही घटना घडली आहे. तरुणाचा वाढदिवसाचा फिवर उतरत नाही तोच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे तरुणाचा वाढदिवस त्याच्या आयुष्यभर आठवणीत राहील असाच झाला आहे.
इंदापूर येथील सचिन दिलीप सातव या 28 वर्षीय तरुणाला पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये तरुणाने वाढदिवस साजरा करत असतांना केक कापण्यासाठी तलवारीचा वापर केला होता. त्यानंतर त्याने हे सर्व फोटो सोशल मिडियावर व्हायरल केले होते.
हीच बाब पोलिसांच्या निदर्शनास आली होती. पोलिसांनी लागलीच तरुणाला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. इंदापूर पोलिसांनी त्याला नोटिस बजावून त्याच्यावर आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील सचिन दिलीप सातव याचा वाढदिवस होता. गाडीच्या सीटवर केक ठेवून तो तलवारीने कापल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याने चर्चेचा विषय ठरत आहे.
यापूर्वी अनेकदा तलवारीने केक कापल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तलवारीने केक कापने गुन्हा असल्याचे माहिती असूनही अनेक तरुण हे कृत्य करीत असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.