दिल्लीत कार चोरायचे, महाराष्ट्रात यायचे अन्… त्यांच्या जगावेगळ्या कारनाम्याने पोलीसही चक्रावले

| Updated on: Jan 13, 2024 | 9:37 AM

सर्वसामान्य जनतेचे रक्षण करणं हे पोलिसांचं कर्तव्य असतात, त्यासाठी ते तैनात असतात. पण कुंपणानेच शेत खाल्लं तर तक्रार कुणाकडे करायची ? असाच सवाल पिंपरी-चिंचवड मधील एका घटनेने उपस्थित झाला आहे.

दिल्लीत कार चोरायचे, महाराष्ट्रात यायचे अन्... त्यांच्या जगावेगळ्या कारनाम्याने पोलीसही चक्रावले
Follow us on

पिंपरी-चिंचवड | 13 जानेवारी 2024 : सर्वसामान्य जनतेचे रक्षण करणं हे पोलिसांचं कर्तव्य असतात, त्यासाठी ते तैनात असतात. पण कुंपणानेच शेत खाल्लं तर तक्रार कुणाकडे करायची ? असाच सवाल पिंपरी-चिंचवड मधील एका घटनेने उपस्थित झाला आहे. दिल्ली येथून चोरी केलेल्या महागड्या चारचाकी गाड्यांचे बनावट कागदपत्र तयार करुन महाराष्ट्रात त्यांची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या टोळीकडून एक कोटीहून अधिक किमतीची 11 वाहन जप्त करण्यात आली आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या टोळीमध्ये सांगली पोलीस दलात कार्य़रत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

पोलिसाचाही चोरांच्या टोळीत समावेश

मिळालेल्या माहितीनुसार, अजीम सलीम पठाण (वय-34 मु.पो. रहिमतपूर , ता. कोरेगाव जि. सातारा), शशिकांत प्रताप काकडे (वय-30 रा. मु.पो. साखरवाडी (पिंपळवाडी) ता. फलटण, जि. सातारा), राजाराम उर्फ राजू तुकाराम खेडकर (वय 34 रा. पटवर्धन कुरोली ता. पंढरपूर जि. सोलापुर), महेश भिमाशंकर सासवे (वय-31 रा. विजापुर रोड, सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर प्रशांत माने (रा. रहीमतपुर), विकास माने (रा. रहीमतपुर), भरत खोडकर (रा. सांगली), हाफिज (रा. मेरठ, उत्तर प्रदेश), इलियास (रा. बेंगलोर), रसुल शेख (रा. इचलकरंजी) अशी आंतरराज्यीय वाहन चोरांची टोळी निष्पन्न झाली आहे. यातील भारत खेडकर हा सांगली जिल्ह्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई आहे. वाहन चोरांच्या टोळीत पोलिसाचाही समावेश असल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

अशी केली अटक

दरोडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार हे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना सहायक पोलीस फौजदार महेश खांडे व पोलीस हवालदार नितीन लोखंडे यांना मिळालेल्या माहितीवरुन 5 जानेवारी रोजी हिंजवडी परिसरातून अजीम पठाण व शशीकांत काकडे यांना ताब्यात घेतले.