‘गुड टच बॅड टच’ वर्कशॉपमध्ये मुलीने जे सांगितलं, थेट पोलिसांनाच बोलवावं लागलं…

| Updated on: Sep 27, 2024 | 8:12 AM

'गुड टच बॅड टच' वर्कशॉप सुरू असताना एका विद्यार्थिनीने जो खुलासा केला ते ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. दोन दिवसांपूर्वीच चार तरूणांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.

गुड टच बॅड टच वर्कशॉपमध्ये मुलीने जे सांगितलं, थेट पोलिसांनाच बोलवावं लागलं...
पिंपरी चिंचवडमध्ये लॉजमध्ये हत्याकांड
Follow us on

पुण्यात पुन्हा एकदा अत्याचाराची घटना समोर आली असून त्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. विद्येच माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात गेल्या अनेक महिन्यांपासून गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच आता एका विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कॉलेजमध्ये ‘गुड टच बॅड टच’ वर्कशॉप सुरू असताना एका विद्यार्थिनीने जो खुलासा केला ते ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. दोन दिवसांपूर्वीच चार तरूणांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या घटनेची माहिती उघड होताच पोलिसांना पाचारण करण्यात आलं असून त्यांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असून ती कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित कॉलेजमध्ये शिकते. तिच्यावर अत्याचार करणाऱ्या चौघांपैकी दोन आरोपी हे अल्पवयीन असून ते 11 वी आणि 12 वीत शिकत आहेत. पुणे पोलिसांनी पोक्सो कायदा आणि बीएनएसच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

असा उघड झाला गुन्हा

पुण्याच्या एका नामांकित कॉलेजमध्ये ‘गुड टच आणिबॅड टच’ या विषयावर वर्कशॉप सुरू होते. त्याचदरम्यान एका विद्यार्थिनीने तिच्या मैत्रिणीसोबत काही दिवसांपूर्वी घडलेली घटना सांगितली. त्या मुलीच्या मैत्रिणीसोबत घडलेला प्रकार ऐकून शिक्षकही हादरले. त्यांनी तातडीने त्या पीडित मुलीच्या पालकांना बोलावून घेतले आणि संपूर्ण प्रकार त्यांच्यासमोर कथन केला. आपल्या मुलीसोबत घडलेली घटना ऐकून ते हादरले, मात्र त्यांनी अन्यायायाला वाचा फोडण्याचा निर्धार करत पोलिस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली.

इन्स्टाग्रामवर झाली मैत्री

त्या अल्पवयीन पीडित मुलीच्या सांगण्यानुसार, चार मुलांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यापैकी एक मुलगा हा तिच्याच कॉलेजमधला आहे, तर इतर तिघांशी तिची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर ती मुलगी त्या आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटली आणि त्यांनी तिचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.