Pune Porsche Accident : पुण्यातील केस चर्चेत पण इतर हाय प्रोफाईलप्रकरणं अजूनही कोर्टात, मुंबईतील निष्पापांना न्याय कधी मिळणार ?

| Updated on: May 22, 2024 | 3:52 PM

पुण्यातील हे ड्रिंक अँड ड्राईव्हचं प्रकरण बरंच चर्चेत असताना मुंबईतील हाय प्रोफाइल ड्रिक अँड ड्राईव्हची अनेक प्रकरणे मात्र अद्यापही कोर्टात प्रलंबित असल्याचं समोर आलं आहे. गळी प्रकरणं ड्रिंक अँड ड्राईव्हची असून कार चालकांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही कोणाला अपघाताच्या काही दिवसांतच तर कोणाला काही महिन्यात जमीन मंजूर झाला आहे .

Pune Porsche Accident : पुण्यातील केस चर्चेत पण इतर हाय प्रोफाईलप्रकरणं अजूनही कोर्टात, मुंबईतील निष्पापांना न्याय कधी मिळणार ?
Follow us on

नामवंत व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने पबमध्ये दारू प्यायली, लायसन्स नसातानाही दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवली आणि एरा बाईकला धडक देऊन तो दोघांच्या हत्येसाठी कारणीभूत ठरला. पुण्याच्या कल्याणीनगरमधील हिट अँड ड्रिंक रन प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. यामध्ये मध्यप्रदेशातील दोघांना जीव गमवावा लागला. याप्रकरणी आता त्या मुलाच्या वडिलांनांही अटक करण्यात आली असून जामीनावर सुटलेल्या त्या अल्पवयीन मुलाला आज बालहक्क न्यायालयात हजर करण्यात आले आहे. 17 वर्ष 8 महिन्यांच्या असलेल्या त्या मुलावर त्याच्यावर प्रौढ म्हणून खटला चालवण्यास परवानगी मिळावी अशी मागणी पोलिसांनी केली होती.

दरम्यान पुण्यातील हे ड्रिंक अँड ड्राईव्हचं प्रकरण बरंच चर्चेत असताना मुंबईतील हाय प्रोफाइल ड्रिक अँड ड्राईव्हची अनेक प्रकरणे मात्र अद्यापही कोर्टात प्रलंबित असल्याचं समोर आलं आहे. जान्हवी गडकरचं 2015 सालच प्रकरणाचा निकाल लागायचा आहे. तर मार्च 2023 मध्ये वरळी सी फेस वर जॉगरचा झालेला मृत्यू आणि त्याचा महिन्यात बीकेसीत झालेल्या अपघातात तीन वर्षीय मुलीच्या मृत्यू प्रकरणी तर खटले तर अद्याप सुरू होणे बाकी आहेत. ही सगळी प्रकरणं ड्रिंक अँड ड्राईव्हची असून कार चालकांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही कोणाला अपघाताच्या काही दिवसांतच तर कोणाला काही महिन्यात जमीन मंजूर झाला आहे . या प्रकरणातील सगळे आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यामुळे ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात ज्यात निष्पाप लोकांवा प्राण गमवावे लागले त्या प्रकरणी उदासिनातेला जबाबदार कोण ? त्यांना न्याय कधी मिळणार ? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

काय आहेत प्रकरणे ?

हे सुद्धा वाचा

पहिलं प्रकरण आहे ते 2015 सालचं. 8 जून 2015 साली फ्री वेवर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता, तर 22 वर्षीय सदिया साबूवाला गंभीरित्या जखमी झाली होती. या अपघाता प्रकरणी कॉर्पोरेट लॉयर असलेल्या जान्हवी गडकरला सदोष मनुष्यवधाप्रकरणी अटक करण्यात आली होती. अपघात झाला तेव्हा जान्हवी गडकर दारूच्या नशेत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. या अपघातानंतर जान्हवी ही 58 दिवस अटकेत होती, त्यानंतर मात्र सत्र न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला. याप्रकरणी खटला सध्या न्यायालयात सुरू असून 14 जूनला आरोप निश्चिती होणार आहे .

तर दुसरं प्रकरण हे गेल्या वर्षी म्हणजे 19 मार्च 2023 चं आहे. त्या दिवशी वरळी सी फेस वर झालेल्या अपघातात राजलक्ष्मी रामकृष्णन (वय 57) यांचा मृत्यू झाला होता. राजलक्ष्मी या Altruist टेक्नॉलॉजी कंपनीच्या सीईओ होत्या. याप्रकरणी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा कर्मचारी असलेल्या सुमेर मर्चंटला अटक झाली होती. दारूच्या नशेत सूमेर मर्चंट गाडी चालवत असल्याचा पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलं आहे. त्याच्या रक्ताच्या नमुन्यात प्रत्येकी 100 मिलिलीटर रक्तात 137 मिली ग्रॅम अल्कोहोलचा अंश सापडल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

100 मिलिमीटर रक्तात केवळ 30 मिलिग्रॅम अल्कोहोलचा अंश असल्यास कारवाई होत नाही. पण सुमेर मर्चंटच्या रक्तात मद्याचा अंश अधिक सापडला. तसेच ही दुर्घटना झाली त्यावेळी गाडीचा वेग 90 ते 100 दरम्यान होता, असा दावाही पोलिसांनी केला. सुमेर मर्चंट विरोधात वरळी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून हा खटला देखील अद्याप सुरू झालेला नाहीये. अपघाताच्या अवघ्या अडीच महिन्यात सत्र न्यायालयाने मर्चंटला जामीन मंजूर केला असून सध्या तो जामीनावर बाहेर आहे.

तिसरं प्रकरण कोणतं ?

तिसरं प्रकरणही खूप दुर्दैवी असून त्या अपघातामध्ये अवघ्या तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. 7 मार्च 2023 ला वांद्रे कुर्ला संकुलात झालेल्या अपघातात तीन वर्षीय स्वाती चौधरी नावाच्या मुलीने जीव गमावला होता. त्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास बीकेसीतील नाबार्ड जंक्शनवर सिग्नल वर गाडी थांबली असताना, त्यांच्या गाडीला समोरून येणाऱ्या लाल फोक्सवॅगन गाडीने जोरदार धडक दिली होती. या अपघातात स्वतीचे काका आणि त्यांचा मित्र जबर जखमी झालेच पण इतरही गाड्यांचं देखील नुकसान झालं होतं. या प्रकरणी बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ कार्यकारी अधिकारी असलेल्या विश्वास अट्टवार, (वय 54) यांना अटक झाली होती. दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याने सदोष मनुष्यवराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हा अपघात झाल्यानंतर केवळ तीन दिवसात अट्टवार यांना जामीन मंजूर झाला होता. या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं असून अद्याप खटला सुरू झालेला नाही. पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्हच प्रकरण चर्चेत असताना मुंबईतील हाई प्रोफाइल ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणे मात्र अद्यापही कोर्टात प्रलंबित असून त्यावर कारवाई कधी होणार असाच प्रश्न लोकांच्या मनात आहे.