Pune Porsche Accident Case : पुणे अपघात प्रकरणी पोलिसांचे मोठे खुलासे… पोलिसांच्या पत्रकार परिषदेतील 5 पॉइंट्स काय?

| Updated on: May 21, 2024 | 2:06 PM

पुण्यातील कार अपघात प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करून प्रकरणाची माहिती घेतली. तसेच या प्रकरणाचा कसून तपास करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

Pune Porsche Accident Case : पुणे अपघात प्रकरणी पोलिसांचे मोठे खुलासे... पोलिसांच्या पत्रकार परिषदेतील 5 पॉइंट्स काय?
Follow us on

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातप्रकरणी आज खुद्द पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयात होणार आहे. तसेच या प्रकरणातील दुसऱ्या गुन्ह्यात तीन लोकांना अटक करण्याच आली आहे. तसेच अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली असून त्यांना पुण्यात आणण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली आहे. अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह पब आणि बारच्या मॅनेजमेंट अशा पाच लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यातील तीन लोकांना अटक केली. त्यांना आज कोर्टात आणण्यात येणार आहे. मुलाच्या वडिलांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना अटक केली जाईल. त्यानंतर उद्या त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

हे सुद्धा वाचा

इतर पुराव्याच्या दृष्टीकोणातून जी गोष्ट गरजेची आहे, त्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहेत. ऑनलाईन पेमेंटची माहिती घेतली जात आहे. किती वाजता झाले, कोणत्या सामुग्रीसाठी झाली आहे. याची माहिती घेतली जात आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

आरोपींनी अल्कहोल घेतलं होतं

कोणताही निगेटिव्ह रिपोर्ट आलेला नाही. ब्लड पाठवलं आहे. त्याचे रिपोर्ट आलं नाही. दोन ठिकाणी ब्लड सँपल घेण्यात आली आहे. त्याबाबत संभ्रम राहणार नाही. आरोपींनी मद्यप्राशन केलं होतं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते दिसत आहे. त्यांनी अल्कोहोलसाठी ऑनलाईन पेमेंट केले होते. त्याचे बिल आले आहे. आमच्याकडील पुराव्यावरून आरोपींनी अल्कहोल घेतल्याचं स्पष्ट झालं आहे, असंही आयुक्तांनी सांगितलं. या मुलांचे वय 16 वर्षाच्यावर आहे. आणि हा प्रकार हिणस कृतीमध्ये येत आहे. तसेच या घटनेत दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या मुलांना अॅडल्ट (प्रौढ) म्हणून मानण्यात यावं, अशी विनंती आम्ही कोर्टाला करणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.

महत्वाचे मुद्दे काय?

वडिलांनीच मित्रांसोबत पार्टी करण्याची परवानगी दिली

कार चालवण्याचं ट्रेनिंग घेतलं नव्हतं

वाहन चालवण्याचा परवाना नव्हता

वडिलांनीच त्यांच्या मालकीची पोर्शे कार मला दिली