पुणे : पुणे जिल्ह्यात ट्रॅक्टर आणि शेतकऱ्याची अन्य वाहने चोरीला जात असल्याचं प्रमाण वाढलं आहे. अशावेळी पुणे ग्रामीण पोलिसांनी ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुणे ग्रामीणच्या गुन्हे शाखेनं या प्रकरणाचा छडा लावत 10 ट्रॅक्टरसह एकूण 20 वाहने, 7 गायींसह 77 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. तशी माहिती पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. अविनाश देशमुख यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे. (Pune Rural Police arrests gang for stealing farmers’ tractors and other vehicles)
वाहन चोरी प्रकरणात तपास सुरु असताना पुणे ग्रामीण पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली होती. शिरुर शहरात राहणाऱ्या काही व्यक्ती चोरीची वाहने आणतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सतीश राक्षे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने आपल्या सहकाऱ्यांसह 28 ठिकामी चोरी केल्याचं सांगितलं. आरोपींकडून पोलिसांनी 10 ट्रॅक्टर, 2 पिकअप, 1 बोलेरो जीप, 1 स्कॉर्पिओ, 6 मोटारसायकल, ऑक्सिजन सिलिंडर, घरगुती गॅस सिलिंडर, 5 गायी, असा मुद्देमाल जप्त केलाय. आरोपीमध्ये ज्ञानदेव नाचबोने, धनु झेंडे, प्रवीण कोरडे आणि सुनील देवकाते यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींनी पुण्यासह अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातही चोरी केली आहे. त्यांनी पुणे जिल्ह्यात 12, अहमदनगर जिल्ह्यात 8 तर सोलापूर जिल्ह्यात एक चोरी केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली केली. त्यांच्या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, जितेंद्र मांडगे, सचिन गायकवाड, दत्तात्रय तांबे, दीपक साबळे, राजू मोमीन, अजित भुजबळ, गुरु जाधव, मंगेश थिळगे, संदीप वारे, अक्षय जावळे यांचा समावेश होता.
पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लॉकडाऊनच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचं पाहायला मिळत होतं. त्या पार्श्वभूमी पोलिसांनी हॉटेल, रेस्टॉरंट्स, बार, हुक्का पार्लरवर छापेमारी केली. कोरोना नियमांचं उल्लंघन करुन व्यवसाय सुरु ठेवणाऱ्या 18 आस्थापना पोलिसांनी सील केल्या.
एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाटी राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि पोलीस दिवसरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, दुसरीकडे हिंजवडी परिसरात कोरोना नियमांचं उल्लंघन करुन अनेक हॉटेल, रेस्टॉरंट्स, बार, हुक्का पार्लर, बिअर शॉपी सुरु ठेवण्यात आल्या होत्या. काही जणांकडून चोरीछुपे व्यवसाय सुरु होता. अखेर पोलिसांनी आज धाडसत्र राबवलं. त्यात 18 आस्थापना सील करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या :
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर पुण्यातील घरी चाकूहल्ला
वृद्ध महिलेची हत्या करुन अतिप्रसंग, पुण्यात घृणास्पद प्रकार, आरोपी चार तासात जेरबंद
Pune Rural Police arrests gang for stealing farmers’ tractors and other vehicles